Salaam-Eagle-TBMAUJ 
Latest

Salaam-Eagle-TBMAUJ : ईगलने ‘लाल सलाम’ला टाकले मागे, जाणून घ्या कलेक्शन

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : रवि तेजाची 'ईगल' आणि रजनीकांतचा 'लाल सलाम' ९ फेब्रुवारी रोजी रिलीज झाला आहे. (Salaam-Eagle-TBMAUJ) दोन्ही साऊथ चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त टक्कर पाहायला मिळत आहे. 'ईगल' आणि 'लाल सलाम'चे पहिल्या दिवशीचे कलेक्शन समोर आले आहेत. (Salaam-Eagle-TBMAUJ)

संबंधित बातम्या –

रवि तेजाचा 'ईगल' आणि रजनीकांत यांचा 'लाल सलाम' चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी रिलीज झाला आहे. साऊथचे दोन जबरदस्त चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. ९ फेब्रुवारी रोजी शाहिद कपूर-कृती सेनॉनचा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' आणि तीन साऊथ चित्रपट 'लाल सलाम', 'अनवेशप्पिन कांडेतम', रवि तेजा की 'ईगल' प्रदर्शित झाला. परंतु, साऊथचा 'ईगल'ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या तुलनेत रजनीकांत यांचा 'लाल सलाम' मागे पडला.

रिपोर्टनुसार, रवि तेजाच्या 'ईगल'ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ६.१ कोटींची कमाई केली. रजनीकांत यांच्या 'लाल सलाम'ने पहिल्या दिवशी केवळ ४.३ कोटी कलेक्शन केलं. ८० कोटींचे बजेट असलेल्या रवि तेजाच्या या चित्रपटाने 'ईगल'ची कहाणी एक कॉन्ट्रॅक्ट किलर सहदेव वर्मा आहे.

चित्रपट 'ईगल' कार्तिक गट्टमनेनीच्या दिग्दर्शनाखाली आणि पीपल मीडिया फॅक्ट्रीच्या बॅनर अंतर्गत या चित्रपटात काव्या थापर, अनुपमा परमेश्वरन, विनय राय, नवदीप आणि मधु यांच्या भूमिका आहेत. 'ईगल' केवळ तेलूगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे.

'लाल सलाम' एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. रजनीकांतची कन्या ऐश्वर्या रजनीकांतने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटामध्ये विष्णु विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहेत. रजनीकांत यांचा कॅमियो आहे. रजनीकांत स्टारर चित्रपट तमिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटात विग्नेश, लिविंगस्टोन, सेंथिल, जीविता, के एस रविकुमार आणि थांबी रमैया देखील आहेत.

तेरी बातों में ऐसा उलझा जिया कलेक्शन

क्रिती-शाहिद कपूरच्या तेरी बातों में ऐसा उलझा जिया चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६ कोटी रुपयांचे ओपनिंग केलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT