पुढारी ऑनलाईन डेस्क : वन-डे विश्वचषक स्पर्धेत आज द. आफ्रिकेच्या फलंदाजांनी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विक्रमांचा पाऊस पाडला. ( ODI WC SA vs SL ) जाणून घेऊयात या विक्रमांबद्दल..
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेसमोर ४२९ धावांचे लक्ष्य ठेवले. आफ्रिकने ५० षटकांमध्ये ५ गडी गमावून ४२८ धावा केल्या . यामध्ये मार्करम १०६, क्विंटन डी कॉक १०० आणि व्हॅन डर डुसेन १०८ यांनी शतके केली. वन-डे वर्ल्डकपच्या इतिहासातील ४२७ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. २०१५ साली मायदेशात झालेल्या वर्ल्डकपमधील पर्थ येथे अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५० षटकांमध्ये ७ गडी गमावत ४१७ धावा केल्या होत्या. (SA vs SRI )
दक्षिण आफ्रिकेकडून तीन खेळाडूंनी शतके झळकावली. यामध्ये क्विंटन डी कॉक (१०० धावा), रॅसी व्हॅन डर डुसेन (१०८ धावा) आणि एडन मार्कराम (१०६ धावा) यांचा समावेश आहे. मार्करामने ४९ बॉलमध्ये शतक झळकावून वर्ल्डकपमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रमही केला. यामध्ये त्याने १४ चौकार आणि ३ षटकार लगावले. शेवटच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करत मार्को जॅनसेन १२ धावांवर आणि डेव्हिड मिलर २९ धावांवर नाबाद राहिला.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेच्या तीन फलंदाजांनी शतके ठोकत अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. याआधी वन-डे वर्ल्डकपमध्ये अशी कामगिरी आजवर कोणत्याही संघाने केली नव्हती. यामध्ये मार्करम (१०६), क्विंटन डी कॉक (१००) आणि व्हॅन डर डुसेन १०८ धावांचा समावेश आहे.
हेही वाचा :