पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेच्या एडवर्ड स्नोडेन यांना काल (दि.२७) रशियाचे नागरिकत्व बहाल केले आहे. स्नोडेन हे अमेरिकेच्या सुरक्षा विभागात एक उच्च पदस्थ राहिले आहेत. अमेरिकेमध्ये स्नोडेन यांच्यावर शासकीय हेरगिरीची कागदपत्रे लीक केल्याचा आरोप ठेऊन खटला चालू आहे. यापासून वाचण्यासाठी ते २०१३ पासून रशियात राहत आहेत.
सध्या रशिया-युक्रेन युद्धामुळे जगाला वेठीस धरले आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यामुळे हे युक्रेन सोबत सर्व जगावर हे युद्ध लादले गेल्याचे चौफेर आरोप होतायेत. यामध्ये अमेरिकेसहित अनेक देशांनी युक्रेनला साथ दिल्याचे समोर येत असताना कालच्या गोष्टीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमेरिका रशियाला विरोध करत असतानाच त्यांचेच एक उच्च पदस्थ रशियाच्या गोटात गेल्याचे चित्र समोर आले आहे.
स्नोडेन यांच्या सोबत इतरही ७५ लोकांना रशियाचे नागरिकत्व देण्यात आले असले तरी स्नोडेन अमेरिकेच्या सुरक्षा विभागाचे माजी कॉन्ट्रॅक्टर असल्याने याबद्दल उलट सुलट चर्चा होताना दिसून येत आहेत.
हे वाचलंत का?