Latest

Russia Ukraine War : लेझर अस्त्राचा रशियाकडून वापर

Arun Patil

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : इलेक्ट्रोमॅग्नेटिक बँडचा वापर करणारी लेझर अस्त्रे आता पारंपरिक शस्त्रांची जागा घेऊ लागली आहेत. हॉलीवूडच्या साय-फाय चित्रपटात आपण लेझर शस्त्रास्त्राद्वारे भस्म झालेली ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाहिली असतील. आता ते प्रत्यक्षात होऊ लागले आहे. रशियाचे (Russia Ukraine War) राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनविरोधात प्रथमच अशा लेझर शस्त्राचा वापर सुरू केला आहे.

युक्रेनमध्ये अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे अशा लेझर शस्त्राद्वारे भस्म केल्याचा दावा रशियाने केला आहे. तज्ज्ञांच्या मते, याद्वारे युक्रेनी सैनिकांना अंध केले जाऊ शकते.

युक्रेनने आतापर्यंत पाश्चिमात्य देशांनी दिलेल्या ड्रोनद्वारे रशियाचा मुकाबला केला आहे. त्यामुळे रशियाने युक्रेनमध्ये आता नेक्स्ट जनरेशन शस्त्रास्त्रांची तैनाती सुरू केली आहे.

झेलेन्स्कींनी उडवली खिल्ली (Russia Ukraine War)

युद्धाला आता तीन महिने पूर्ण होत आले आहेत आणि आता रशिया त्यांच्या वंडर वेपनचा शोध घेऊ लागला आहे. यातून दिसून येते की रशियाचे मिशन पूर्णतः अपयशी ठरले आहे, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

पेरेसवेट

पुतीन यांनी 2018 मध्ये लेझर शस्त्र पेरेसवेट याचा उल्लेख केला होता. पुरातन योद्धा सन्यासी अ‍ॅलेक्झांडर परेसवेट याचे नाव या अस्त्राला दिले आहे. पेरेसवेटच्या तैनातीला सुरवात झाली आहे. पृथ्वीपासून 1500 किलोमीटवर असलेल्या उपग्रहांना अंध करण्याची ताकद या अस्त्रात आहे, अशी माहिती उपपंतप्रधान आणि मिलिट्री डेव्हलपमेंटचे प्रमुख यूरी बोरिसोव यांनी दिली आहे.

जदिरा

युक्रेनमध्ये रशियाने त्यांचे नवे आणि अत्यंत शक्तिशाली अशा जदिरा हे अस्त्र तैनात केले आहे. मे महिन्याच्या प्रारंभी त्याचे परीक्षण करण्यात आले होते. युक्रेनमध्ये जदिराच्या पहिल्या प्रोटोटाईपचा वापर केला जात आहे. इन्फ्रारेड लाईटद्वारे 5 किलोमीटर अंतरातील ड्रोन, क्षेपणास्त्रे 5 सेकंदात भस्म करू शकते.

पोर्तुगालच्या पंतप्रधानांची झेलेन्स्की यांनी घेतली भेट

कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांची भेट घेतली. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत युरोपीय संघात सामील होण्यासाठी युक्रेनला कुठल्याही कराराची आवश्यकता नाही, असेही झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले.

रशियाने लुहान्स्क भागातील शाळेवर बॉम्ब वर्षाव केला. येथे 200 जणांनी आश्रय घेतला होता. यातील तिघांचा मृत्यू झाल्याचे समजते. रशियाने शनिवारपासून शेजारी राष्ट्र असलेल्या फिनलँडला नैसर्गिक वायूचा पुरवठा रोखला. काही दिवसांपूर्वीच नॉर्डिक देशांनी 'नाटो'मध्ये सहभागी होण्याविषयी इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून रशिया या देशांवर भडकला आहे.

'कान्स'मध्ये युक्रेनी महिला रेडकार्पेटवर झाली विवस्त्र

फ्रान्समधील सुप्रसिद्ध 'कान्स' चित्रपट फेस्टिव्हलमध्ये शनिवारी अचानक एका युक्रेनी महिलेने टॉपलेस होत 'आमच्यावरील बलात्कार थांबवा' अशी घोषणाबाजी केली. तिने शरीर युक्रेनी ध्वजाच्या रंगात रंगविले होते. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा तिने निषेध केला.

अमेरिकेत 40 अब्ज डॉलर मदतीचे विधेयक मंजूर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी युक्रेनला आणखीा 40 अब्ज डॉलर (सुमारे 3.11 लाख कोटी रुपये) मदत देण्याची घोषणा केली. यातील 20 अब्ज डॉलरची लष्करी मदत असेल तर 8 अब्ज डॉलर आर्थिक मदतीसाठी असतील. 5 अब्ज डॉलर जगभरातील अन्न तुटवड्यासाठी असतील. तर एक अब्जाहून अधिकची मदत स्थलांतरीतांसाठी असेल.

रशियावर सायबर हल्ले ः पुतीन

पाश्चिमात्य देश रशियावर सायबर हल्ले करत असल्याचा आरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी केला आहे. हे हल्ले अयशस्वी ठरवले असल्याचेही ते म्हणाले. तसचे रशियन सैन्याने मारियुपोलवर संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित केल्याचे म्हटले आहे. युद्धातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी आहे, असेही रशियाने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT