मेडिका : पोलंड-युक्रेन सीमेवर युक्रेनियन स्थलांतरिताच्या बाळाला जोजविताना पोलिश जवान.  
Latest

Russia Ukraine War : पुतीन एक पाऊल मागे!

Arun Patil

मॉस्को/कीव्ह ; वृत्तसंस्था : वोल्दिमीर झेलेन्स्की हे युक्रेनचे (Russia Ukraine War) नेते असल्याचे रशियाने मान्य केले आहे. याआधी चर्चेसाठी झेलेन्स्कींनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार व्हावे आणि नवे सरकार स्थापन करावे, अशी अट घालणार्‍या रशियामध्ये झालेला हा बदल पुतीन यांनी शांततेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल असल्याचे मानले जात आहे. अर्थात, बेलारूस-पोलंड सीमेवर दोन्ही देशांदरम्यान युद्धविरामासाठी चर्चेची दुसरी फेरी होणार असतानाही इकडे युक्रेनमध्ये रशियन फौजांकडून गोळीबाराच्या फैरी झडतच होत्या.

युद्धाच्या आठव्या दिवशीही रशियन हल्ले सुरूच आहेत. कीव्ह, खार्कोव्हसह मोठ्या शहरांवर रशियाकडून क्षेपणास्त्रांचा मारा सुरूच आहे. रशियन हवाई दलाने कीव्हलगत एका रहिवासी इमारतीवर क्षेपणास्त्र हल्ला केला.

चर्चेसाठी याआधी युक्रेनमधील सत्तांतराची अट घालणार्‍या रशियाने अखेर झेलेन्स्की हे युक्रेनचे नेते असल्याचे मान्य केले आहे. आमचा देश झेलेन्स्कींना युक्रेनचा नेता मानण्यास तयार आहे. झेलेन्स्की यांच्या सुरक्षेचीही आम्ही काळजी घेऊ. आमची फक्‍त एकच अट आहे, ती म्हणजे युक्रेनने त्यांच्याकडे किती शस्त्रसामग्री आहे, याची इत्थंभूत माहिती आम्हाला द्यावी, असे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लावरोव्ह यांनी सांगितले.

पोलंड-बेलारूसवर रशिया-युक्रेनदरम्यान (Russia Ukraine War) चर्चेची दुसरी फेरी गुरुवारी होणार होती. युक्रेनशी चर्चा करण्यासाठी आमचे शिष्टमंडळ बुधवार दुपारपासून बेलारूसमध्ये ताटकळलेले आहे. युक्रेनचे शिष्टमंडळ गुरुवार उजाडला तरी दाखल झालेले नाही, असे रशियन सरकारचे प्रवक्‍ता दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले.

तथापि, दोन्ही देशांदरम्यान चर्चा पोलंडच्या हद्दीत होईल, असे ठरलेले होते. याउपर युक्रेनचे शिष्टमंडळ चर्चेसाठी येईल, अशी अपेक्षा बेलारूस हद्दीत वाट बघत असलेल्या रशियन अधिकार्‍यांना होती; मात्र ऐनवेळी युक्रेनने चर्चेला नकार दिला. चर्चेचे स्थळ बेलारूस हे रशियाचे मित्रराष्ट्र असल्याने ऐनवेळी दगाफटका होऊ शकतो, हे कारण या नकारामागे असल्याचे मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT