Gold rate today 
Latest

Gold Silver Price : रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याच्या दरात बदल, जाणून घ्या प्रति तोळा दर

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

Gold Silver Price : रशिया- युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine war) देश-विदेशातील बाजारांत सोन्याच्या दरात बदल होत आहे. आज आठवड्याच्या चौथ्या दिवशी सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ५१ हजारांवर होते. तर चांदीचे दर तेजीत आहेत. चांदी प्रति किलो ६७ हजारांवर पोहोचली आहे. दरम्यान, मल्टि कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याचे दर वाढले आहे. एमसीएक्सवर सोने प्रति १० ग्रॅम ५१,५७० रुपयांवर गेले आहे. तर चांदी प्रति किलो ६७,२४० रुपयांवर आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, Gold Silver Price २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,३२८ रुपये, २३ कॅरेट सोने ५१,१२२ रुपये, २२ कॅरेट सोने ४७,०१६ रुपये, १८ कॅरेट सोने ३८,४९६ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३०,०२७ रुपये आहे. चांदीचा प्रति किलो दर ६७,६५२ रुपये आहे. (हे दुपारी २ पर्यंतचे अपडेटेड दर असून त्यात बदल होऊ शकतो)

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला केल्यापासून जगभरातील बाजारांत त्याचा परिणाम दिसून येत आहे. भारतात सोन्याच्या किमतीने ५१ हजारांचा टप्पा पार केला.

जगात जेव्हा तणावाची परिस्थिती अथवा संकटे निर्माण होतात त्यावेळी त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर होतो. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक (सेफ हेवन मालमत्ता) म्हणून सोन्यात गुंतवणूक करतात. यामुळे सोने तेजीत येते. सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सोने एका वर्षातील उच्चांकी स्तरावर पोहोचले आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT