लंडन : पुढारी ऑनलाईन
लंडनमधील एका क्लब सामन्यात प्रतिस्पर्धी संघांमध्ये असलेले दोन युक्रेनियन खेळाडू भेटले तेव्हा एकमेकांना बिलगून ते रडत होते. यावेळी त्यांच्या संघांनी नो वॉरचा बॅनरही झळकावला. (#RussiaUkrainWar)
इंग्लिश प्रीमियर लीगमधील शनिवारचा दिवस हृदय हेलावणारा ठरला. पहिल्यांदा पश्चिम लंडनमधील बे्रंटफोर्ड आणि न्यूकॅसल या दोन्ही संघांच्या चाहत्यांनी ख्रिस्टीयन एरिक्सन याचे मैदानावर जोरदार स्वागत केले. युरो चषक स्पर्धेदरम्यान एरिक्सनला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी तो मैदानात कोसळला होता. आठ महिन्यांनी तो ग्राऊंडवर परतला. त्यावेळी सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. (#RussiaUkrainWar)
गुडीसन पार्क मैदानावर खेळवण्यात आलेल्या मँचेस्टर सिटी आणि एवर्टन यांच्यातील सामना सिटीने 1-0 असा जिंकला. या सामन्यावेळी सिटीकडून खेळणार्या अॅलेक्झांड्रो जिनचेंको आणि एवर्टन संघातील विटाली मायकोलेंको हे दोन युक्रेनचे खेळाडू एकमेकांना भेटल्यानंतर एकमेकांना बिलगून रडत होते. मायदेशात होत असलेल्या रशियन फौजेच्या हल्ल्यामुळे ते व्यथित झाले होते. (#RussiaUkrainWar)