Latest

Russia Vs Ukraine : युक्रेनवर पूर्ण ताकदीनिशी आक्रमण करण्याच्या तयारीत रशिया

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाने भलेही असं सांगितलं असेल की, युक्रेनच्या सीमेवरून सैनिकांना मागे बोलवलं आहे; पण अमेरिकेने त्यावर विश्वास ठेवलेला नाही. नाटोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "सध्या स्टाफला युक्रेनच्या राजधानीपासून पश्चिमकडील लीव शहरात हलविण्यात येत आहे. त्याचबरोबर बेल्जियममध्येही अधिकाऱ्यांनी पाठविण्यात येत आहे. आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा खूप महत्त्वाच्या आहेत. कारण, कीवपासून लीव आमि ब्रुसेल्समध्ये हलविण्यात येत आहे. (Russia Vs Ukraine)

पश्चिमेकडील अनेक राष्ट्रांनी यापूर्वीच आपापल्या कूटनितीज्ञांना कीवमधून दुसऱ्या शहरात पाठविले आहे. लीव शहरातील पोलंडच्या सीमेवर किंवा त्याच्या आसपास रशियाचे लष्कर नाही. पण, इथेच ब्रुसेल्समध्ये नाटोच्या मुख्य कार्यालय आहे. अमेरिकेचा पुरस्कार करणाऱ्या नाटोने आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितलं की, "रशिया काही आठवड्यांतच युक्रेनवर निशाणा साधणार आहे आणि त्याचं पहिलं टार्गेच कीव शहर असू शकतं."

युक्रेन हा नाटोचा सदस्या नाही आणि त्याचं कोणतीही लष्कर नाही. पण, १९९० नंतर कीवमध्ये नाटोने आपल्या दोन कचेऱ्या वसविल्या होत्या. एक कचेरी यासाठी बनविण्यात आली होती की, नाटो आणि युक्रेन सरकारमधील संवाद होऊ शकेल आणि सुरक्षेवर जास्त लक्ष ठेवण्यात येऊ शकेल. (Russia Vs Ukraine)

नाटोच्या प्रमुखांनी सांगितलं की, "रशियाच्या सर्व हालचाली हे दर्शवित आहे की, तो संपूर्ण ताकदीनिशी युक्रेनवर हल्ला करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे आम्हा सर्वांचं एकमत झालं आहे की, हल्ला होण्याची शक्यता जास्त आहे." पण, यापूर्वी नाटोच्या प्रमुखांनी सांगितलं होतं की, "युक्रेनच्या संरक्षणासाठी कोणतंही लष्कर तैनात करण्यात येणार नाही." नाटोच्या सदस्य राष्ट्रांनी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये आपल्या लष्करी पाठविल्या आहेत. नोटाच्या प्रमुखांनी सांगितलं, "रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर, त्याचा प्रतिकार नक्की केला जाईल."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT