देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवरुन तिचा पती निक जोनास (Nick Jonas) याचे नाव हटवलंय. आतापर्यंत प्रियांकाच्या इन्स्टावर प्रियांका चोप्रा जोनास असे नाव होते. आता त्यातून जोनास हटविण्यात आलंय. यामुळे प्रियांका निकसोबत घटस्फोट तर घेत नाही ना अशी चर्चा रंगू लागलीय. यावर प्रियांका आणि तिची आई मधू चोप्रा यांनी खुलासा केला आहे.
प्रियांकाने (Priyanka Chopra) जोनास (Jonas) आडनावासह तिचे चोप्रा (chopra) आडनावदेखील हटवलंय. तिने इन्स्टाग्रामवर केवळ प्रियांका (Priyanka) असे नाव ठेवलंय. प्रियांका आणि निकच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच्या ते वेगळे होत असल्याचं वृत्त पसरत आहे. दरम्यान, प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी, प्रियांका हिच्याबाबतीत जे काही वृत्त पसरले आहे ती केवळ अफवा असल्याचे म्हटलंय. दोघांमध्ये सगळे काही चांगले चालले आहे. दोघे सोबत राहून खूप खुश आहेत, असा खुलासा त्यांनी केलाय.
प्रियांकानं जोनास नाव हटविल्यामुळे तिच्या चाहत्यांना वाटू लागले आहे की, दोघांच्या नात्यात दुरावा आला असून ते वेगळे होणार आहेत. याच दरम्यान, निक जोनासनं इन्स्टाग्रामवर आपल्या वर्कआउटचा एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात तो हार्ड वर्कआउट करताना दिसतोय. त्याच्या या व्हिडिओवर स्वतः प्रियांकानं कमेंट केलीय. " तू जवळ असतानाच मला मृत्यू यावा…" Damn! I just died in your arms… ? ? ❤️ अशी कमेंट करत प्रियांकानं हार्ट इमोजी शेअर केलाय. तिच्या या कमेंटमुळे ती निक पासून वेगळे होऊ शकत नाही, असेच संकेत मिळत आहेत. अनेकांनी या कमेंटला लाइक्स केलंय.
प्रियांका आणि निक जोनासचा २०१८ मध्ये राजस्थानच्या जोधपूरमध्ये शाही पद्धतीने विवाह झाला होता. पहिल्यांदा त्यांनी हिंदू रितिरिवाजाप्रमाणे लग्नगाठ बांधली आणि त्यानंतर दोघांचा ख्रिश्चन पद्धतीने लग्नसोहळा पार पडला होता. प्रियांका आणि निक यांच्यामध्ये १० वर्षांचं अंतर आहे. या लग्नसोहळ्यातला एकही फोटो लीक होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती.