पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या सुरू असलेल्या विशेष स्वच्छता अभियान ३.० च्या (Swachhata' Campaign) पहिल्या दोन आठवड्यांत केवळ भंगाराची विल्हेवाट लावून सरकारला ११७ कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवला आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग (विज्ञान आणि तंत्रज्ञान, राज्यमंत्री पीएमओ, कार्मिक) यांनी दिली. पहिल्या दोन आठवड्यांच्या शेवटी मोहिमेच्या प्रगतीचा आढावा ही माहिती देण्यात आली आहे. .
मंत्री सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वच्छता विशेष अभियान 3.0 हा उपक्रम भारतभर राबवला गेला. यामध्ये भंगाराच्या विल्हेवाटमुळे ३२.५४ लाख चौरस फूट एवढी कार्यालयीन जागा रिकामी झाली आहे.तसेच यामधून ११७ तोटींचा महसूल देखील प्राप्त झालेला आहे. असे मंत्री म्हणाले.
हेही वाचा