RRR movie : actor ram charan  
Latest

RRR ने जमवला ९०० कोटींचा गल्ला, टीमला दिली सोन्याची नाणी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

सध्या 'आरआरआर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करीत आहे. 550 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने अवघ्या दहा दिवसांमध्ये जगभरात 900 कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय केला आहे. ट्रेड अ‍ॅनालिस्ट मनोबाला विजयबालन यांच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा पाचवा भारतीय चित्रपट ठरला आहे. अभिनेता राम चरण याने या चित्रपटाच्या यशाच्या आनंदात चित्रपटाच्या क्रूसाठी चहा-पाण्याचे आयोजन केले होते. यावेळी त्याने सर्व टीमला भेट म्हणून सोन्याची नाणी दिली. या 'ब—ेकफास्ट'ला प्रॉडक्शन मॅनेजर, अकौंटंट, कॅमेरा असिस्टंट, फोटोग्राफर, डायरेक्शन टीमच्या लोकांसह अन्य क्रू मेम्बर उपस्थित होते. या सर्वांना एक किलो मिठाई आणि एक तोळ्याचे सोन्याचे नाणे भेट म्हणून देण्यात आले. नाण्याच्या एका बाजूला 'आरआरआर'चा लोगो आणि दुसर्‍या बाजूला रामचरणची प्रतिमा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT