Rover Pragyan New IMG 
Latest

Rover Pragyan: ‘प्रज्ञान’ रोव्हरने चंद्रावरील ‘हा’ सर्वात कठीण अडथळा केला पार

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताच्या चांद्रयान मोहिमेतील लँडरने चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करत अंतराळ संशोधनात इतिहास रचला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चंद्रावरील घडामोडीची त्यांच्या एक्सवरून (पूर्वीचे ट्विटर) वेळोवेळी नवीन अपडेट देत आहे. दरम्यान, आज 'इस्रो'ने प्रज्ञान 'रोव्हर' ने चंद्रावरील सर्वात मोठा अडथळा पार केल्याचे म्हटले आहे. प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावरील १०० मिमी चा खड्डा यशस्वीरित्या पार (Rover Pragyan) केला आहे, अशी माहिती चांद्रयान-३ चे प्रकल्प संचालक पी वीरमुथुवेल यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'शी बोलताना दिली.

चांद्रयान-३ चे प्रकल्प संचालक पी वीरमुथुवेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोव्हरने पृष्ठभागावरील खड्ड्याचा पहिला अडथळा पार केला आहे. अशी अनेक अडथळे आणि आव्हाने पार करण्यासाठी इस्रोकडून वेळोवेळी मार्गदर्शन आणि देखरेख करणे सुरू ठेवावे लागेल. आतापर्यंतच्या वैज्ञानिक प्रयोगांच्या प्रगतीने चांगले परिणाम मिळण्याच्या शक्यतेबद्दल आमचा आत्मविश्वास वाढवला आहे, असेही चांद्रयान-३ मोहिमेच्या संचालकांनी 'टाईम्स ऑफ इंडिया' शी बोलताना स्पष्ट केले. (Rover Pragyan)

प्रज्ञान रोव्हरने  ४ मीटर व्यासाचा खड्डा केला पार: ISRO ची माहिती

रविवारी २७ ऑगस्ट २०२३ रोजी, रोव्हर त्याच्या स्थानाच्या 3 मीटर पुढे सरकला. त्यानंतर प्रज्ञान रोव्हरने ४ मीटर व्यासाचा खड्डा ओलांडून  पुढे यशस्वीरित्या प्रवास केला आहे. चंद्राच्यापृष्ठभावर खड्डा दिसताच रोव्हरला मार्ग मागे घेण्यास सांगितले होते. मात्र त्याने हा अडखळा यशस्वीरित्या पार करत, तो आता सुरक्षितपणे नवीन मार्गावर पुढे जात आहे, असे इस्रोने एक्सवरून (पूर्वीचे ट्विटर) म्हटले आहे.

Rover Pragyan: चंद्राच्या पृष्ठभागावरील तापमानाच्या निरीक्षणाची नोंद

भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेतील लँडरने बुधवारी (दि.२८) चंद्रावर सुस्थितीत लँडिंग केले. यानंतर प्रज्ञान रोव्हरने देखील त्याचा चंद्रावर पाऊल टाकण्याचा टप्पा यशस्वीरित्या पार करत, त्याचा पुढचा प्रवास सुरू केला. इस्रोने दिलेल्या ताज्या अपडेटनुसार, रविवारी (दि.२८) लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावरील आणि त्याच्या खोलीवरील तापमानाचे निरीक्षण (Rover Pragyan) केल्याचे सांगितले होते.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT