Latest

Rohit Sharma India vs Australia : रोहित शर्माचा नवा विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय फलंदाज

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्‍या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये १७ हजार धावा करणारा तो देशातील सातवा तर जगातील २८वा फलंदाज बनला आहे. सचिन तेंडूलकर, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहलीच्‍या यादीत आता रोहित शर्माने दिमाखात प्रवेश केला आहे. ( Rohit Sharma India vs Australia )

ऑस्‍ट्रेलिया विरुद्ध अहमदाबाद येथे सुरु असलेल्‍या चौथ्‍या कसोटीत रोहितने आपल्‍या आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधील १७ हजार धावांचा नवा टप्‍पा गाठला. चौथ्‍या कसोटीच्‍या पहिल्‍या डावात रोहित ३५ धावांवर बाद झाला. त्‍याला मॅथ्‍यू कुहनेमन याने बाद केले.

Rohit Sharma India vs Australia : रोहितच्‍या वन-डेमध्‍ये सर्वाधिक धावा

रोहित शर्माने आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये सर्वाधिक धावा वन-डे फॉर्मेटमध्‍ये केल्‍या आहेत. त्‍याने वन-डेमध्‍ये २४१ सामन्‍यांमध्‍ये ९,७८२ धावा केल्‍या आहेत. १४८ टी-२० सामन्‍यात ३,८५३ तर ४८ कसोटीत त्‍याने ३,३४४ धावा केल्‍या आहेत. वन-डेमध्‍ये त्‍याने ३०, कसोटी ९ तर टी-२० मध्‍ये ४ शतके झळकावली आहेत.

२०१९ मध्‍ये कसोटी क्रिकेट चॅम्‍पियशिप सुरु झाल्‍यापासून रोहितने २२ कसोटीत १७०० धावा केल्‍या आहेत. सध्‍या सुरु असलेल्‍या कसोटी मालिकेत त्‍याने २०० हून अधिक धावा करत फलंदाजीच्‍या क्रमावारीतही आघाडी घेतली आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये पहिल्या ३ कसोटीत शतक ठोकणारा रोहित एकमेव फलंदाज होता. नागपूरमधील पहिल्या कसोटीत रोहितच्या १२० धावांमुळे मालिकेतील पहिला सामन्‍यात भारताने एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला होता.

आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

    फलंदाज                       धावा

  • सचिन तेंडुलकर                 ३४,३५७
  • विराट कोहली                    २५,०४७
  • राहुल द्रविड                       २४,०६४
  • सौरव गांगुली                     १८,४३३
  • एमएस धोनी                      १७,०९२
  • वीरेंद्र सहवाग                     १७,२५३
  • रोहित शर्मा                         १७, ०००

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT