Latest

Maharashtra Politics : रोहित पाटील यांचे फेसबुक पेज हॅक, आक्षेपार्ह फोटो पोस्ट

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचे फेसबुक पेज हॅक झाले आहे. या पेजवरुन आक्षेपार्ह फोटो पोस्ट केले जात आहेत. याबदद्ल स्वत: रोहित पाटील यांनी त्यांच्या अधिकृत 'X' अकाउंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी अकाउंट हॅक करण्याच्या कृतीवर निषेध व्यक्त केला आहे. (Maharashtra Politics)

मी निषेध करतो

रोहीत पाटील यांनी फेसबुक पेज हॅक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आपल्या 'X' अकाउंटवर ट्वीट केले आहे. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "माझे अधिकृत फेसबुक पेज हॅक झाले असून काही आक्षेपार्ह फोटो पोस्ट केले जात आहेत. सदर अकाउंट रिकव्हर करण्याचा प्रयत्न आम्ही करत असून आपण सर्वांनी सदर ची पोस्ट रिपोर्ट करावे अशी विनंती आहे. निवडणुकीच्या दरम्यान विरोधी पक्षातील लोकांचे अकाउंट हॅक होताना सर्वत्र दिसत असून मी या वृत्तीचा निषेध करतो.

– रोहित आर आर पाटील"

राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे, "माझे युवा सहकारी आणि स्व. आर. आर पाटील (आबा) यांचा वारसा चालवणारे रोहित पाटील यांचे facebook पेज ऐन निवडणुकीच्या काळात दुसऱ्यांदा हॅक झालं. यावर पडणारा चुकीचा मजकूर आणि आक्षेपार्ह फोटो हटवून पेज रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू असून या चुकीच्या मजकुराकडे दुर्लक्ष करावं!"

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT