Latest

इंदापूर तालुक्याला हादरवून टाकणारी घटना, गाडीवर गोळीबार करत तब्बल ३ कोटी ६० लाखांची रोकड लुटली

अमृता चौगुले

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा:  पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरकुटे बुद्रुक पाटी (ता. इंदापूर) येथे चार चाकी गाडी अडवून गोळीबार करत 3 कोटी 60 लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना शुक्रवारी 26 ऑगस्ट रोजी पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेने प्रवासी नागरिकांसह पोलिस खाते देखील हादरून गेले आहे. ही रक्कम हवाला व्यवहारातील असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या बाबतची सविस्तर माहिती अशी की, भावेशकुमार अमृत पटेल (वय ४०, रा. कहोडा, ता. उंझा, जि. मेहेसाना, राज्य गुजरात, सध्या रा. पंचरत्न बिल्डींग, मुंबई) यांनी इंदापूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास वरकुटे पाटी गावचच्या हद्दीत पुणे- सोलापुर राष्ट्रीय महामार्गांवर गतीरोधक आल्यानं त्यांनी चारचाकी स्कॉपीओ गाडी (टीएस ०९ ईएम ५४१७) हळू केली.

यावेळी अज्ञात चार अनोळखी चोरटयांनी पायी चालत येऊन हातात लोखंडी टॉमी दाखवून फिर्यादी यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु फिर्यादी यांनी गाडी तेथुन भरधाव वेगात सोलापुरकडून पुण्याकडे घेतली. यावेळी मारूती स्विप्ट गाडी व टाटा कंपनीच्या गाडीतून त्यांचा अज्ञातांनी पाठलाग केला. भावेशकुमार पटेल यांनी तरीदेखील गाडीथांबवली नाही. यानंतर लुटारांनी पटेल यांच्या गाडीवर गोळीबार केला. त्यांनतर या लुटारुंनी त्यांची गाडी रस्त्यामध्ये अडवुन गाडीतील भावेशकुमार व विजयभाई यांना चौघांनी मारहाण केली आणि गाडीमधील ३ कोटी ६० लाख रूपये रोख रक्कम व १४ हजारांचे दोन तसेच १२ हजाराचा एक मोबाईल असे एकुण ३ कोटी ६० लाख २६ हजार रुपये किंमतीचा माल लुटला.

दरम्यान या घटनास्थळी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, सुरेशकुमार धस, गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक अशोक शेळके, भिगवणचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी भेट देऊन गुन्ह्याचा सखोल तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याचे तपाससाठी पाच पोलीस पथके तयार केली असून तपास कामी रवाना करण्यात आल्याची माहिती इंदापूरचे प्रभारी पोलीस निरिक्षक प्रभाकर मोरे यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT