इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी राज्यभर तीव्र आंदोलने होत असून मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा म्हणून राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. इंदापूर तालुक्यातील बावडा येथील बागल फाटा या ठिकाणी इंदापूर – अकलूज रस्त्यावर मराठा समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला आहे. तसेच टायर पेटवून देऊन सरकारचा निषेधही करण्यात आला आहे. यावेळी सकल मराठा समाजाचे अनेक आंदोलन करते रस्त्यावर बसून जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा पवित्रा घेतला आहे. दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या रांगा लागल्या आहेत.