File Photo 
Latest

अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयी

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभेच्या '१६६ – अंधेरी पूर्व' या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज (दि.  ६)  पार पडली. एकूण ६६,५३० मतांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ऋतुजा रमेश लटके विजयी झाल्या आहेत, अशी घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील केली. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक देवेश देवल उपस्थित होते. त्यानंतर पाटील यांनी विजयी उमेदवार ऋतुजा लटके यांना पोटनिवडणुकीत विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले.

'अंधेरी पूर्व' या विधानसभा मतदारसंघाच्या सर्व २५६ केंद्रावर दिनांक ३ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या मतदान प्रक्रियेत एकूण ३१.७५ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. आज या मतदानाच्या मतमोजणीस सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. प्रारंभी टपाली मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर एकूण १९ फेऱ्यांमध्ये ई.व्ही.एम. द्वारे मतमोजणी करण्यात आली. मतमोजणी केंद्राच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माध्यमांना मतमोजणी प्रक्रियेची तत्काळ माहिती मिळण्याच्या दृष्टीने माध्यम कक्षही स्थापन करण्यात आला होता.
..
महाराष्ट्र विधानसभेच्या '१६६ – अंधेरी पूर्व' या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत शेवटच्या १९व्या फेरी अखेर अणि टपाली मतदानातून उमेदवारांना मिळालेली एकूण मते याची आकडेवारी खालील प्रमाणे आहे:

१)  ऋतुजा रमेश लटके (पक्ष – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) : ६६,५३०

२)  बाला व्यंकटेश नाडार (पक्ष – आपकी अपनी पार्टी ) : १,५१५

३) मनोज श्रावण नायक (पक्ष – राईट टू रिकॉल पार्टी) : ९००

४)  नीना खेडेकर (अपक्ष ) : १,५३१

५) फरहाना सिराज सय्यद (अपक्ष ) : १,०९३

६) मिलिंद कांबळे (अपक्ष ) : ६२४

७) राजेश त्रिपाठी (अपक्ष ) : १,५७१

आणि

नोटा : १२,८०६

एकूण मते : ८६,५७०

अवैध मते – २२

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT