पुढारी ऑनलाईन डेस्क : मूळचे भारतीय ऋषी सुनक यांनी ब्रिटनमध्ये इतिहास घडवला आहे. इंग्लडचे पंतप्रधानपद धारण करणारे ते पहिले भारतीय वंशाचे नागरिक ठरणार आहे. संपूर्ण जगभरातून सुनक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सुनक यांनी मंगळवारी ( दि. २५ ) सरकारी निवासस्थान 10 डाऊनिंग स्ट्रीटवर पोहोचले. येथे त्यांनी देशवासीयांना संबोधित केले. यावेळी डाऊनिंग स्ट्रीटवर उपस्थित मांजरावरुन 'लॅरी द डाउनिंग स्ट्रीट' ( Larry Cat ) असे मजेशीर ट्विट व्हायरल झालं आहे. यावर ब्रिटनमध्ये जोरदार चर्चा सुरु असून या फोटोवर अनेकांनी हटके कंमेटही केल्या आहेत.
व्हायरल झालेल्या फोटोत सुनक हे डाउनिंग स्ट्रीटवर भाषण देताना दिसत आहेत. यावेळी रस्त्याच्या दिव्याजवळ बसलेली लॅरी मांजरही दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून, यावर अनेकांनी हटके कंमेटही केल्या आहेत.
ब्रिटननमधील राजकीय घडामोडींवर भाष्य करणार्या Twitter handle 'Chief Mouser' ने म्हटलं आहे की, लॅरी ज्या प्रकारे बसली आहे. तो खर्या अर्थाने बॉस दर्शवणारा अँगल आहे. एका युर्जरने लिहिलं आहे की, समोर उभारलेली महिला ही तिच्या फोनवर लॅरीचा फोटो काढत आहे. एकाने म्हटलं आहे की, लॅरी ही तुमच्यावर बारीक नजर ठेवणार्या पोलिसासारखी आहे.
एका वापरकर्त्याने तर हद्द केली. त्याने लिहिलं आहे की, 'प्रिय लॅरी. डाउनिंग स्ट्रीटमधला तू खरोखरच मुख्य माणूस आहेस.' तर या फोटोवरुन डाऊनिंग सेंट येथील रविवाशांमध्ये एक सूसुत्रता असल्याचे दिसून येते, असा टोलाही एकाने लगावला आहे.
चार्ल्स तृतीय यांनी ऋषी सुनक यांना नवे सरकार स्थापन करण्यासाठी मंगळवार ( दि.२५) आमंत्रित केले. राजे चार्ल्स आणि सुनाक यांची बकिंगहॅम पॅलेसच्या कक्ष क्रमांक 1844 मध्ये भेट झाली. येथेच चार्ल्स यांनी सुनाक यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करीत असल्याचे पत्र दिले. आता 28 ऑक्टोबरला पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर ते 29 ऑक्टोबरला नवे मंत्रिमंडळ जाहीर करण्याची शक्यता आहे.
सुनक 4 वर्षांतील पाचवे पंतप्रधान ऋषी सुनाक यांच्या निवडीने नवा इतिहास रचला गेलेला असला तरी त्यांच्यासमोर आव्हानेही तेवढीच मोठी आहेत. ऋषी हे गेल्या चार वर्षांतले ब्रिटनचे पाचवे पंतप्रधान आहेत. सुनक हे ब्रिटनला संकटाबाहेर काढतील, प्रचंड विश्वास हुजूर पक्षाला आणि ब्रिटनच्या जनतेला आहे.
बकिंगहॅम पॅलेसमधून ऋषी सुनाक पंतप्रधानांच्या अधिकृत कारमधून सरकारी निवासस्थान 10 डाऊनिंग स्ट्रीटवर पोहोचले. पंतप्रधान म्हणून देशाला उद्देशून पहिले भाषण त्यांनी केले. "सध्या देश संकटात आहे. आपण एकत्रितपणे याचा मुकाबला करू. आपली अर्थव्यवस्था सध्या अवघडलेली आहे. कोरोनामुळे आधीच खूप समस्या होत्या. पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करून त्यात भर घातली आहे. माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांनीही आर्थिक संकट निवळावे म्हणून प्रयत्न केले. पण काही चुका झाल्या. त्या आपण आता सुधारणार आहोत. मी या देशाची घडी पुन्हा एकदा बसविणार आहे. हे केवळ शब्द नाहीत, हे मी करून दाखवेन. मी रात्रंदिवस काम करेन," असा निर्धार बोलून दाखवून त्यांनी देशाला आश्वस्त केले.