Latest

Rishabh Pant : ऋषभ पंतच्या ‘त्या’ चुकीवर रोहित शर्मा भडकला, म्हणाला… (Video)

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : फलंदाजी किंवा विकेटकीपिंग ऋषभ पंत (Rishabh Pant) चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यातही पंतने विकेटकीपिंगदरम्यान असे काही केले ज्याची सामन्यानंतरही चर्चा होत राहिली. यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा पंतवर भडकल्याचे दिसले. मात्र, काहीवेळाने संघातील इतर सहका-यांनी तो प्रसंग मजेदार पद्धतीने घेतला. चलातर जाणून घेऊया रोहित ऋषभ पंतवर का भडकला?

झालं असं की, विंडीजचा संघ भारताने दिलेल्या 192 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान संघाचा कर्णधार पूरन 5 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी ऑफ साइडच्या सर्कलमध्ये उभ्या असलेल्या संजू सॅमसनने चपळाईने तो चेंडू पकडला आणि झटपट विकेटकीपर पंतकडे (Rishabh Pant) फेकला. पूरनला माहित होते की ती धाव पूर्ण होणार नाही, त्यामुळे त्याने परत क्रिजमध्ये येण्याचाही प्रयत्न केला नाही. त्याचवेळी भारतीय यष्टीरक्षक पंतही हातात चेंडू असूनही पूरनला धावबाद करू शकला नाही. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने पंतला ओरडून पूरनला बाद करण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

निकोलस पूरन बाद होण्यापूर्वी तो भारतासाठी धोकादायक दिसत होता. त्याने 8 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 24 धावांची तुफानी खेळी साकारली. पाचव्या षटकात अक्षर पटेलला पूरनने चोपले. या षटकात विंडीज कर्णधाराने एका चौकारासह तीन षटकार ठोकले. (Rishabh Pant)

चौथ्या टी 20 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावून 191 धावा केल्या. या धावसंख्येसमोर विंडीजचा संपूर्ण संघ 19.1 षटकांत 132 धावांत गारद झाला. भारताकडून आवेश खान, अक्षर पटेल आणि रवी बाश्नोईने प्रत्येकी दोन बळी घेतले, तर अर्शदीप सिंगने 12 धावांत तीन बळी घेतले. भारताने हा सामना 59 धावांनी जिंकून मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT