Latest

केविन पीटरसन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘हिरो’ का म्हणाला?

backup backup

इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पिटरसन याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले. केविन पिटरसनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिरो संबोधले. त्याने नरेंद्र मोदींचे ट्विट रिट्विट करुन त्यावर ही प्रतिक्रिया दिली आहे.

जागतिक गेंडा दिवसाचे औचित्य साधून आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा शर्मा यांच्या हस्ते एकशिंगी गेंड्याची तब्बल २४७९ जप्त केलेली शिंगे जाळून टाकली. या उपक्रमाची माहिती त्यांनी ट्विट करुन दिली. 'आसाम आणि भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आम्ही एक अभुतपूर्व निर्णय घेत एकशिंगी गेंड्याचे तब्बल २ हजार ४७९ शिंग जाळण्याचा निर्णय घेतला. जागतिक स्तरावर इतक्या मोठ्या प्रमाणावर शिंग जाळण्याची ही बहुदा पहिलीच घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसाममधील एकशिंगी गेंड्याच्या शिकारी बंद करण्याच्या व्हिजननुसार काम करण्याचा प्रयत्न आहे.' असे ट्विट केले.

हे ट्विट नरेंद्र मोदी यांनी रिट्विट करुन त्यावर 'टीम आसामने छान काम केले आहे. एकशिंगी गेंडा हा भारताचा अभिमान आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी जे काही करता येईल ते करणार आहोत.' अशी प्रतिक्रिया दिली. नरेंद्र मोदी यांच्या या ट्विटवर वन्यजीव संवर्धक केविन पिटरसन याने प्रतिक्रिया दिली.

पिटरसनने मोदींचे केले कौतुक

त्याने 'नरेंद्र मोदीजी तुमचे खूप खूप आभार! गेंड्यांसाठी एक जागतिक नेता उभा राहिला आहे. याचा आदर्श अनेक नेत्यांनी घ्यावा. त्यांच्यामुळेच भारतातील गेंड्यांची संख्या अत्यंत चांगल्या प्रकारे वाढत आहे. काय हिरो आहेत!' असे ट्विट केले.

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा शर्मा हे या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे होते. त्यांनी सांगितले की, या कार्यक्रमाद्वारे आम्ही जगाला एक कडक संदेश देऊ इच्छितो. आसामच्या दृष्टीने गेंड्याचे शिंग हे जीवंत गेंड्याच्या डोक्यावरच चांगले दिसते.

एकशिंगी गेंडा हा भारतात सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. विशेषकरुन आसाममध्ये तो मोठ्या प्रमाणात आढळून येतो. काझिरंगा राष्ट्रीय उद्यान हे एकशिंगी गेंड्यांसाठीच राखीव ठेवण्यात आले आहे. मात्र शिकारीमुळे गेल्या काही काळापासून एकशिंगी गेंड्यांची संख्या प्रचंड वेगाने कमी होती होती.

आशियातील चीन, व्हिएतनाम यासारख्या काही देशांमध्ये पारंपरिक औषधोप्चारासाठी एकशिंगी गेंड्याचे शिंग वापरले जाते. त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमणात कत्तल करण्यात येते. यामुळेच १९७७ मध्ये गेंड्याच्या शिंगांच्या व्यापारावर बंदी घालण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT