पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री रिया चक्रवर्ती ( Rhea Chakraborty ) २०२० मध्ये सुंशात सिंह रजपूतच्या निधनानंतर चर्चेत आली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील ड्रग्जच्या अँगलचा तपास होत असताना त्यात रिया आणि तिचा भाऊ शौविकचे नाव समोर आले होते. या दोघांना अटकही झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर रिया बरेच दिवस माध्यमांपासून आणि सोशल मीडियापासून दूर होती. आता पुन्हा एकदा रिया चर्चेत आली आहे.
रियाच्या ( Rhea Chakraborty ) आय़ुष्यात नवे प्रेम आल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. अभिनेत्री अंकिला लोखंडेशी ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत रियाला डेट करत होता. हे दोघं काही दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहिले होते. आता ती बंटी सजदेहला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. बंटी हा रिअॅलिटी स्टार आणि फॅशन डिझायनर सीमा सजदेहचा भाऊ आहे. सीमा ही सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी आहे. काही महिन्यांपासून बंटी आणि रिया डेट करत असल्याचे सांगितले जात आहे.