Latest

कौतुकाची थाप ! पुणे पोलिसांना दहा लाखांचे बक्षीस प्रदान

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  26़/11 सारखा मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असणार्‍या आणि दहा लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. या दहशतवाद्यांना बेड्या ठोकणार्‍या कोथरूडमधील पाच पोलिस अंमलदारांचा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांना 10 लाख रोख रक्कम आणि प्रमाणपत्र एनआयएचे पोलिस अधिकारी इंगवले आणि पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी सहपोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, अप्पर पोलिस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया आदी उपस्थित होते.

मागच्या काही वर्षांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणा अल सुफा या संघटनेशी निगडित असणार्‍या दहशतवाद्यांचा शोध घेत होते. कोथरूड पोलिसांनी दुचाकी चोरताना या तिघा दहशतवाद्यांना पकडले होते. त्यांची घरझडती घेण्यासाठी कोंढव्यात गेले असताना साथीदार मोहम्मद शाहनवाज आलम पसार झाला होता. युसूफ खान आणि महम्मद युनूस साकी या दोघांकडे चौकशी केल्यावर त्यांना एनआयएने फरार घोषित केल्याचे समजले होेते. पुणे पोलिसांच्या तत्परतेमुळे दहशतवादी कारवायांचा डाव उधळला गेला. या उत्कृष्ट कामगिरी केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यातील अंमलदार अमोल नजन, प्रदीप चव्हाण, बाला रफिक शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ, कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील आणि पोलिस निरीक्षक नीलिमा पवार यांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT