Latest

नगर ग्रामपंचायत Live : श्रीगोंद्यात नऊपैकी आठ ग्रामपंचयातींचे निकाल जाहीर

अमृता चौगुले

श्रीगोंदा :  पुढारी ऑनलाइन वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायत पैकी दुपारी बारा पर्यत आठ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, निकाल लागताच समर्थकांनी एकच जल्लोष केला. मतदान मोजणीसाठी आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला चवर सांगवी, थिटे सांगवी, तरडगव्हाण, माठ या ग्रामपंचायतीचे निकाल घोषित करण्यात आले.दुपारी एकनंतर काष्टी ग्रामपंचायतची मतमोजणीस सुरुवात होणार आहे. दुपारी एकपर्यत हाती आलेले निकाल खालीलप्रमाणे.

१) थिटे सांगवी- सरपंच- अर्जुन रामचंद्र शेळके- ६८ मतांनी विजयी. एकुण पडलेली मते- ४५७
२) चवरसांगवी- सरपंच- सुनिता माळशिकारे- ३ मतांनी विजयी. एकुण पडलेली मते- १२५
३) तरडगव्हाण- सरपंच- कुंदा बेरड राजेंद्र – ७ मतांनी विजयी. एकुण पडलेली मते- ३३१
४) माठ – सरपंच- अरुण विश्वनाथ पवार- ३९५ मतांनी विजयी. एकुण पडलेली मते- ७२२
५) घोगरगाव- सरपंच- सुजाता मिलिंद भोसले- १०१ मतांनी विजयी. एकुण पडलेली मते- १३७३
६) तांदळी दुमाला- सरपंच- संजय मारुती निगडे – १६१ मतांनी विजयी. एकुण पडलेली मते- १२०२
७) पारगाव सु।।- सरपंच – सुरेखा दत्तात्रय हिरवे, १०४ मतांनी विजयी. एकुण पडलेली मते- २१७०
८) बेलवंडी बु।। – सरपंच- ऋषिकेश आण्णासाहेब शेलार-३३१३ मतांनी विजयी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT