Latest

Republic Day 2023 : कर्तव्य पथावर देशाच्या सामर्थ्याचं दर्शन आणि स्त्री शक्तीचाही जागर

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : आज देशभरात ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनी आज राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर पथसंचलन झाले. कर्तव्य पथावर झालेल्या पथसंचलनाच्या माध्यमातून देशाच्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं. महाराष्ट्रासह 17 राज्यांची आणि विविध केंद्रीय मंत्रालयांची 10 अशी एकूण 27 चित्ररथे कर्तव्यपथावर झळकली. यावेळी महाराष्ट्राने चित्ररथाच्या माध्यामातून स्त्री शक्तीचा जागर केला.

कर्त्यव्यपथावर प्रथमच इजिप्त सशस्त्र दलांची एकत्रित बँड आणि संचलन तुकडी सामील झाली होती. इजिप्तच्या सशस्त्र दलाच्या मुख्य शाखांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या तुकडीत 144 सैनिक होते. लेफ्टनंट सिद्धार्थ त्यागी यांच्या नेतृत्वाखालील 17 मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटच्या NAG क्षेपणास्त्र प्रणालीने राष्ट्रपती मुर्मु यांना सलामी दिली. लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत यांच्यासह 144 तरुण खलाशांचा समावेश असलेल्या भारतीय नौदलाच्या तुकडीने सलामी दिली. प्रथमच, संचलन तुकडीत तीन महिला आणि पाच पुरुष अग्निवीरांचा समावेश होता. सहाय्यक कमांडंट पूनम गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय राखीव पोलीस दलाची महिला तुकडी देखील या परेडमध्ये सहभागी झाली होती. सीमा सुरक्षा दलाच्या उंट तुकडीने कर्तव्यपथावर अभिवादन केले. महिला उंट स्वार प्रथमच परेडमध्ये सहभागी होत विविध क्षेत्रात महिला सक्षमीकरणाचे दर्शन घडवले.  

कर्तव्य पथ संचालनात महाराष्ट्राच्या चित्ररथात साडेतीन शक्तीपिठे दर्शवण्यात आली. महाराष्ट्राचे याआधी ४० वेळा राजधानीत होणाऱ्या मुख्य पथसंचलनात चित्ररथ सादर झाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने राज्याच्यावतीने 'साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्त‍ि' या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ होता. या माध्यमातून नारी शक्ति राज्यातील मंदिर शैली आणि लोककलाचा अमूर्त वारसा प्रदर्श‍ित केला. महाराष्ट्र संताची आणि देवतांची भूमी आहे. महाराष्ट्रात महत्वाची साडेतीन शक्त‍िप‍ीठे होती. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्त‍िपीठे आहेत. तर, वण‍ीची सप्तशृंगी हे अर्ध शक्त‍िपीठ आहे. या शक्तिर्पीठांना स्त्री शक्त‍िचे स्त्रोत मानले जाते. यांना यावर्षी चित्ररथाच्या माध्यमातून दर्शविण्यात आले.

चित्ररथाच्या पुढील दर्शनीय भागात गोंधळी, देवीचा भक्त संबळ वाद्य वाजवित असल्याची मोठी प्रतिकृती दर्शविली. समोरील डाव्या व उजव्या भागात पांरपारिक लोककलेचे वाद्य वाजविणारे आराधी, गोंधळी यांची मध्यम आकाराची प्रतिमा होती. त्यांच्यामागे फिरते मंदिर होते. यात साडेतीन शक्तिपीठांमधील देवींच्या प्रतिमा होत्या. यामागे पोतराज आणि हलगी वाजविणारे देवीचे भक्तांची दोन मोठी प्रतिकृती होत्या. त्यांच्या समोरील भागास लोककलाकार आराधी, भोपी, पोतराज लोककला सादर केली. (Republic Day 2023)

पाहा कर्तव्य पथावरील पथसंचलन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT