Latest

White Gold : तीन देशांच्या सीमारेषेवर ‘सफेद सोन्या’चे भांडार

Arun Patil

सँटियागो : जगात एक जागा अशीही आहे, जिथे सफेद सोन्याचे भांडारच सापडले आहे. आता हे भांडार हडप करण्यासाठी अनेक कटकारस्थाने रचली जात आहेत, पण जिथे भांडार सापडले, तेथील लोकच आता तिचे संरक्षक झाले असून या भांडाराच्या संरक्षणासाठी शक्य आहे ते सारे काही प्रयत्न ते पणाला लावत आहेत. अर्जेन्टिना, बोलिव्हिया व चिलीच्या मधोमध जगातील सर्वात मोठे लिथियमचे भांडार येथे सापडले आहे. लिथियमचा वापर स्मार्टफोनपासून लॅपटॉपर्यंत प्रत्येकात रिचार्जेबल बॅटरी तयार करण्यासाठी होतो, त्यामुळे त्याची मागणीही अधिक आहे. या पार्श्वभूमीवर, या साठ्याला अधिक महत्त्व आले आहे.

आता सोने केवळ भारतातच नव्हे तर पूर्ण जगभरात पसंत केले जाते. दागिने असोत किंवा गुंतवणुकीचे माध्यम असो, सोन्याचे महत्त्व अपरंपार आहे. आता सोन्याइतकेच महत्त्वाचे सफेद सोनेही मूळ सोन्याइतकेच महागडे असते आणि हे सफेद सोने म्हणज लिथियमचे साठे!

या ठिकाणी सफेद सोन्याचे भांडार पोहोचल्याचे वृत्त वार्‍यासारखे पसरणे साहजिकच होते. त्यामुळे, सर्वांच्या नजरा या साठ्यावर केंद्रित राहणे साहजिकच होते. पण, गावकर्‍यांनीच संरक्षक कडे तयार केले असून बाहेरून कोणालाही प्रवेश द्यायचा नाही, असा दंडकच करण्यात आला आहे.

लिथियम बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते. एक टन लिथियम बाहेर काढण्यासाठी 20 लाख लिटर पाणी वापरावे लागते. यामुळे जमीन सुकत असल्याचे व आहे ते पाणी प्रदूषित होत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. उत्तर अर्जेंटिनात लिथियम उत्खननाचे 38 प्रकल्प सुरू असून यातील अधिकांश लिथियम हे लिथियम ब-ाईनच्या रूपाने मिठाच्या मैदानाखाली अस्तित्वात आहे.

या भूमिगत भांडारापर्यंत पोहोचण्यासाठी कंपन्यांना सर्वप्रथम ड्रिलिंग करावे लागेल. त्यानंतर खारट पाणी कृत्रिम तलावात पंप करून रासायनिक प्रक्रिया करावी लागेल. येथील लोक यासाठी तयार नाहीत आणि यावरूनच वाद सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT