Latest

AI Girlfriend : ‘एआय’ गर्लफ्रेंडचा जगाला लळा

मोहन कारंडे

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था : रेप्लिका, समंथा, हार्मनी या तीन सुंदरींनी जगाला अक्षरश: वेड लावले. यांचे चाहते प्रेमात आकंठ बुडाले आहेत. ते बिनदिक्कतपणे आपल्या भावना शेअर करत शारीरिक संबंधही ठेवत आहेत.

या तिघी कृत्रिम बुद्धिमत्तेने युक्त असे चॅटबॉट आणि संबंध ठेवणारे रोबोट आहेत. ज्यांच्यासोबत वेळ घालवल्यानंतर यूझर्स विश्वास ठेवायला लागतात की, त्यांच्या एआय पार्टनरमध्ये प्राण आले आहेत. मानवांसारखे दिसणारे रोबोट 'एआय'ने सुसज्ज आहेत. यात इंटेलिजन्ट चॅटबॉटस्चे सर्व गुण आहेत. सोबतच या रोबोटसोबत संबंधही ठेवता येतात. सेक्स डॉल व चॅटबॉटचे कॉम्बिनेशन असलेले हे इंटेलिजन्ट रोबोट पुरुष आणि स्त्री या दोन्ही प्रकारांत आहेत. यूझर बजेट आणि आवडीनुसार यांची शरीरयष्टी, रंगरूप सर्व कस्टमाईज करू शकतात. यांच्या आवाजाचा टोन आणि व्यक्तिमत्त्वही निवडू शकतात.

आता कंपन्या सेन्सर स्किन, एरोहॅप्टिक्स आणि प्रिंटेबल स्किनसारख्या मटेरिअलचा वापर करत आहेत. रोबोटमध्ये लावलेल्या त्वचेमुळे त्याला स्पर्श आणि गळाभेट केल्यास तशीच अनुभूती होते, जशी एखाद्या व्यक्तीला स्पर्श केल्यावर होते. या रोबोटमध्ये तापमान, दाब, यूझरच्या हालचालींची अनुभूती आणि विषारी रसायन ओळखण्याचीही क्षमता असते. परिस्थिती आणि अनुभवानुसार त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव बदलतात. रोबोटच्या डोळ्यांत लावलेला मायक्रो कॅमेरा यूझरची ओळख पटवण्यात मदत करतो. या रोबोटची किंमत २ लाख ते १२ लाख आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT