पुणे : पुढारी वृत्तसेवा : आरोपींकडून मिळालेले पिस्तुल, काडतूस तसेच इतर मुद्देमाल, रासायनिक प्रयोग शाळेस पाठवण्यास उशीर झाल्याने व आरोपींच्या कपड्यावरील मिळालेले रक्त मृताच्या रक्ताशी मॅच झालेले नसल्याबरोबर आरोपींकडून झालेली रिकवरी ही संशयास्पद असल्याच्या बचाव पक्षाच्या युक्तीवादानंतर पुण्यातील गँगवारमध्ये खुन झालेल्या कुणाल पोळ प्रकरणातील 21 जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.
जंगल्या विशाल श्याम सातपुते, सागर मोहन शिंदे, अमित नारायण घाडगे, हरीश नरसिंगराव कोंडाळ, किरण दशरथ थोरात, आकाश रमेश भुतेकर, मंगेश श्याम सातपुते, तुषार शाम सातपुते, सचिन हनुमंत देवगिरीकर, सिद्धार्थ राम लोखंडे, सुभाष बाबू गड्डम, अक्षय विजय घुले, शंकर तीपन्ना कोळी, भूषण सुनील लडकत, आकाश राजेंद्र सपकाळ, रोहन लक्ष्मण चव्हाण, गणेश शंकर पवार, रिजवान नसीर सय्यद, दत्ता अर्जुन द चव्हाण, सोनू कृष्णा रणपिसे, सोन्या खंडागळे यांची न्यायालयाने सुटका केली. बचाव पक्षाच्या वतीने अॅड. इब्राहिम शेख, अॅड. सचिन कुंभार, अॅड. विनायक माने, विवेक शिंदे तसेच इतरांनी काम पाहिले.
दिनांक 13 जानेवारी 2014 रोजी सम्राट हॉटेल, सेव्हन लव्हज चौक पुणे, येथे सर्व संशयीत आरोपींनी संगणमत करून कुणाल पोळ व त्याचे साथीदार हे च्या बाहेर गप्पा मारीत उभे असताना पिस्टल व यासारख्या नाटक शस्त्राने हल्ला करून, गोळ्या झाडून कुणाल पोळ यास जीवे ठार मारले फिर्यादी व हॉटेल मालक याच्यावर गोळ्या झाडून त्यांना गंभीर जखमी करून सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले, असा आरोप करण्यात आला होता. तब्बल आठ वर्षे हा खटला चालला.