Latest

रिलेशनशिप मॅनेजर करिअरचा उत्तम मार्ग

Arun Patil

बँकिंग क्षेत्रात रिलेशनशिप मॅनेजर होऊन करिअर उत्तम प्रकारे सुरू करता येते. या क्षेत्राविषयी जाणून घेऊया…

बँकेच्या रोजच्या कामकाजाविषयी आपल्याला माहिती असतेच. बँकेत कॅशिअर, मॅनेजर अशी अनेक कामे आपल्याला समोर दिसतात, पण बँकिंग क्षेत्रात अशी अनेक पदे आहेत जी पडद्यामागे राहून काम करता येतात. त्यांना चांगला पगारही मिळतो आणि चांगल्या प्रशिक्षणामुळे पदोन्नतीही मिळते. बँकेत रिलेशनशिप मॅनेजर असे एक पद असते. बँकिंग कार्यप्रणाली चांगल्या प्रकारे चालावी हे सुनिश्चित करण्याचे काम रिलेशनशिप मॅनेजरचे असतेच, पण ग्राहकांना आपली बँक सुरक्षित आणि योग्य आहे असे वाटावे ही देखील त्यांची जबाबदारी असते. बँकेतील कर्मचार्‍यांना बँकेच्या नीतीनियमांबद्दल माहिती देतो.

वेतन : हे पद जबाबदारीचे असते त्यामुळे रिलेशनशिप मॅनेजर्सचे पगारही वेगवेगळे असतात. रिलेशनशिप मॅनेजरचा सुरुवातीचा पगार 25 हजार रुपयांपासून 30 हजार रुपये प्रतिमहिना असा असतो. अनुभवाअंती पद आणि पगार हे दोन्ही वाढू लागतात. या क्षेत्रात जितके नवीन उपक्रम राबवू शकता तितके अधिक यशस्वी होऊ शकता.

पात्रता : बारावी आणि पदवी परीक्षा यांच्या व्यतिरिक्त बँकिंग क्षेत्रातील पदविका, प्रमाणपत्र किंवा पदव्युत्तर पदविकासारखा अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रात चंचुप्रवेश करण्याचा मार्ग सोपा होतो. आपल्याला टेली सेल्स, टेली मार्केटिंग, आर्थिक सेवा, क्रॉस सेलिंग, आऊडबाऊंड कस्टमर केअर, व्हॉईस प्रोसेस, सेल्स, बॉडी लॅग्वेज आणि संवादाची शैली आदींचे प्रशिक्षण यात घ्यावे लागते. सत्वर निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे तसेच ग्राहकांच्या कोणत्याही प्रश्नाला समाधानकारक उत्तर देण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे.

पदापर्यंत कसे पोहोचाल : बारावीपर्यंत गणित आणि कॉमर्सचे विषय असलेल्या विद्यार्थ्यांना यासाठी प्राधान्य दिले जाते. पदवी स्तरावरीव बीबीए पदवी असेल तरीही या पदावर काम करता येते. काही बँकांमध्ये पदोन्नती देऊन हे पद दिले जाते, तर काही बँकांमध्ये एमबीए उत्तीर्ण उमेदवारांची थेट नेमणूक करते.

कामाचे स्वरूप : रिलेशनशिप मॅनेजरचे काम कर्ज, चालू खाते आणि बचत खाते यांची कागदपत्रे तपासणे, ती पुढे पाठवणे तसे भारतीय तपास यंत्रणा (सीआयबीआयएल) ने दिलेले गुणांकन तपासणे, क्रेडिट टीमच्या फाईलची प्रगती जाणून घेणे तसेच त्यासाठी कागदपत्रांची फाईल दाखवणे आणि डीएसए आणि डीएसटीमधून अहवाल आणणे या प्रकारचे असते. या क्षेत्रातील खास गोष्टींचे प्रशिक्षण घेतल्यास आपल्याला यश नक्कीच मिळेल.

नोकरीचे पर्याय : रिलेशनशिप मॅनेजर म्हणून खासगी किंवा सरकारी बँका, आर्थिक संस्था, केपीओ किंवा बीपीओमध्ये नोकरी मिळू शकते. त्याशिवाय थोडा अनुभव मिळवल्यानंतर आर्थिक सल्लागार म्हणूनही काम करता येते. बँकांमध्ये मार्केटिंग आणि सेल्स, फायनान्शिअल मॅनेजर, ह्यूमन रिसोर्स, वैयक्तिक आर्थिक सल्लागार, कर्ज समुपदेशक, कर्ज अधिकारी, रेव्हेन्यू एजंट असेही नोकरी व्यवसायाचे पर्याय अनुभवाअंती मिळतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT