Latest

रेखा ते राधिका आपटे ! या १२ अभिनेत्रींनी बोल्‍ड आणि न्यूड सीन्स देऊन चाहत्यांना फोडला घाम

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड इंडस्ट्रीतील अभिनेत्रींच्या सौंदर्याचे सर्वांनाच वेड लागले आहे. पडद्यावर या अभिनेत्रींचा स्टायलिश लूक आणि बोल्ड अवतार पाहून चाहतेही थक्क होतात. स्क्रिप्टच्या मागणीनंतर अनेकदा या अभिनेत्रींना चित्रपटांमध्ये बोल्‍ड आणि न्यूड सीन्स द्यावे लागतात. आज आम्ही तुम्हाला या रिपोर्टमध्ये त्या सर्व बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्याने हे सीन्स देताना बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या.

सिमी गरेवाल (Simi Garewal)

70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवालने 'मेरा नाम जोकर' चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स दिले होते. या चित्रपटात या अभिनेत्रीने ऋषी कपूर यांच्या शिक्षिकेची भूमिका साकारली होती. तीने दिलेल्या बोल्ड सीन्सची खूप चर्चा झाली होती.

रेखा (Rekha)

बॉलिवूड इंडस्ट्रीतील एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासोबतच अभिनयासाठीही ओळखली जाते. या यादीत रेखाचाही समावेश आहे. 'आस्था' चित्रपटात त्यांनी ओम पुरी आणि नवीन निश्चल यांच्यासोबत बोल्ड सीन्स दिले होते.

झीनत अमान

झीनत ही तिच्या काळातील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक होती. ही अभिनेत्री तिच्या स्टायलिश अंदाज आणि ड्रेसिंगसाठी प्रसिद्ध होती. झीनतने 'सत्यम शिवम सुंदरम' या चित्रपटात एकापेक्षा एक बोल्ड सीन्स दिले होते, जे आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत.

मंदाकिनी

मंदाकिनीचा 'राम तेरी गंगा मैली' हा चित्रपट कोणी कसा विसरेल. या चित्रपटात अभिनेत्री पांढऱ्या साडीत दिसली होती आणि तिच्या बोल्ड अवताराची खूप चर्चा झाली होती. मंदाकिनी आणि राजीव कपूर यांच्यातील चुंबनही या चित्रपटात चित्रित करण्यात आले होते.

अनु अग्रवाल

अनु अग्रवालला 'आशिकी' चित्रपटातून प्रेक्षकांमध्ये खरी ओळख मिळाली. यानंतर अनुने 'द क्लाउड डोर' चित्रपटात काम केले. या चित्रपटात अनु एका दृश्यात टॉपलेस दिसली होती.

मल्लिका शेरावत (Mallika Sherawat)

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने 'मर्डर' चित्रपटात तसेच 2003 मध्ये आलेल्या 'ख्वाइश' चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स दिले होते, ज्याची त्यावेळी खूप चर्चा झाली होती. या चित्रपटातील त्यांचा हा अवतार पाहून प्रेक्षकही थक्क झाले होते.

सीमा रहमानी (Seema Rahmani)

सीमा रहमानी देखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. 'सिन्स' चित्रपटात या अभिनेत्रीने शायनी आहुजासोबत अनेक बोल्ड सीन्स दिले होते.

शर्लिन चोपड़ा (Sherlyn Chopra)

शर्लिन चोप्रा ही बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे, जी अनेकदा आपल्या स्टाईलने चाहत्यांना खिळवून ठेवते. 'कामसूत्र 3D' या चित्रपटात अभिनेत्रीने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.

नंदना सेन (Nandana Sen)

'रंग रसिया' या चित्रपटात नंदना सेनने सेमी न्यूड सीन देऊन सर्व चाहत्यांना चकित केले होते. या चित्रपटात रणदीप हुड्डा आणि नंदना यांच्यात अनेक बोल्ड सीन्सही चित्रित करण्यात आले होते.

सनी लियोनी (Sunny Leone)

'जिस्म 2' चित्रपटात सनी लिओनीने रणदीप हुड्डासोबत अनेक किसिंग आणि बोल्ड सीन्स दिले होते. या चित्रपटातील सनीच्या बोल्ड अवताराचे चाहतेही वेडे झाले होते. याशिवाय 'रागिनी एमएमएस 2'मध्ये सनी लिओनीने तिचा बोल्ड अवतार दाखवला आहे.

ईशा गुप्ता (Esha Gupta)

ईशा गुप्ताने 'जन्नत 2' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिचा इमरान हाश्मीसोबतचा लिप-लॉक सीन चांगलाच व्हायरल झाला होता.

राधिका आपटे (Radhika Apte)

राधिका आपटे ही एक उत्तम अभिनेत्री आहे, जिने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. तीने 'पार्च्ड' चित्रपटात न्यूड सीन देऊन इंडस्ट्रीला हादरवून सोडले होते. या चित्रपटात तिने लज्जो या खेड्यातील मुलीची भूमिका साकारली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT