Latest

Bajaj Finance : बजाज फायनान्सच्या ‘या’ कर्ज वाटपांना स्थगिती; रिझर्व्ह बँकेचे निर्देश

backup backup
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा ; रिझर्व्ह बँकेने बुधवारी बजाज फायनान्सला (Bajaj Finance) त्यांची दोन कर्ज देणारी उत्पादने तात्काळ प्रभावाने थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये 'ई कामर्स' आणि 'इन्स्टा ईएमआय कार्ड' अंतर्गत कर्जाची मंजुरी आणि वितरण यांचा समावेश आहे.
बजाज फायनान्स (Bajaj Finance) कंपनीने रिझव्‍‌र्ह बँकेच्या डिजिटल कर्ज मार्गदर्शक तत्त्वांच्या तरतुदींचे पालन केले नाही, त्यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेकडुन ही कारवाई करण्यात आली आहे. बजाज फायनान्सने 'ई कामर्स' आणि 'इन्स्टा ईएमआय कार्ड'या दोन कर्ज देणाऱ्या उत्पादनांतर्गत कर्जदारांना मुख्य माहिती असलेले विधाने जारी न करणे तसेच कंपनीने मंजूर केलेल्या इतर डिजिटल कर्जांच्या संदर्भात जारी केलेली माहिती यामध्ये असलेली कमतरता यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. दरम्यान, कंपनीने या उणीवा सुधारल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेचे समाधान झाल्यास या निर्बंधांचे पुनरावलोकन केले जाईल, असेही रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे. १५ नोव्हेंबरला यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक काढत माहिती दिली आहे.
हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT