Latest

RBI KYC Guidelines : घरात बसून केवायसी अपडेट करा, बँकेच्या चकरा मारणे विसरा

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : RBI KYC Guidelines : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) केवायसीचे (KYC) नियम सोपे केले आहेत. आता केवायसी करण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. आता नवीन केवायसी (Know-Your-customer) प्रक्रिया घरातून किंवा कुठेही व्हिडिओ आधारित ग्राहक ओळख प्रक्रियेद्वारे (V-CIP) पूर्ण केली जाऊ शकते. मात्र, काही प्रकरणांमध्ये बँकेच्या रेकॉर्डमध्ये उपलब्ध केवायसी कागदपत्रे अधिकृतपणे वैध कागदपत्रांच्या सध्याच्या सूचीशी जुळत नसल्यास नवीन केवायसी प्रक्रिया किंवा कागदपत्रे सादर करावी लागेल, अशीही माहिती आरबीआयने दिली आहे.

आरबीआयने 5 जानेवारी 2023 रोजी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. ज्यात म्हटलंय की, ग्राहक आता त्याच्या नोंदणीकृत ईमेल आयडी, मोबाइल नंबर, एटीएम, ऑनलाइन बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंग, मोबाइल अॅप किंवा पत्राद्वारे घरी बसून केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकतो. यामध्ये बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. जर पत्त्यात बदल झाला असेल, तर नविन त्त्याचा पुरावा या माध्यमातून सादर केला जाऊ शकतो आणि बँकेला दोन महिन्यांत व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करावी लागेल.

आरबीआयकडून बँकांना निर्देश

नवीन केवायसी प्रक्रिया व्हिडिओ-आधारित ग्राहक ओळख प्रक्रियेद्वारे किंवा बँकेच्या शाखेत न जाता जाऊन कुठेही बसून केली जाऊ शकते. आरबीआयने म्हटले आहे की केवायसीमध्ये कोणताही बदल न झाल्यास, ग्राहक केवळ स्वयं-घोषणा देऊन पुन्हा केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकतो आणि हे पुरेसे मानले जाईल. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, बँकांना अशी सुविधा देण्यास सांगण्यात आले आहे ज्यामध्ये ग्राहकांच्या सेल्फ-डिक्लेरेशनची प्रक्रिया नॉन-फेस-टू-फेस चॅनेलद्वारे पूर्ण केली जाऊ शकते.

असे करा व्हिडिओ आणि नेटबँकिंगद्वारे KYC…

अनेक बँकांनी व्हिडिओ केवायसीची सुविधा सुरू केली आहे. यासाठी बँकेच्या वेबसाइटवर जाऊन KYC व्हिडिओ पहा. हा पर्याय तिथे उपलब्ध असल्यास त्यावर क्लिक करा. यानंतर तुमचा व्हिडिओ कॉल बँक एक्झिक्युटिव्हशी कनेक्ट होईल. तो तुम्हाला तुमची कागदपत्रे दाखवायला सांगेल. कागदपत्रे दाखवून तुम्ही ऑनलाइन केवायसी करू शकता. नेट बँकिंगद्वारे देखील केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी नेट बँकिंग सुरू असणे महत्त्वाचे आहे.

आधार कार्ड पासून

तुम्ही तुमच्या बँक खात्याचे केवायसी आधार कार्डद्वारे घरी बसूनही करू शकता. मात्र, यासाठी बँकेतील नोंदणीकृत क्रमांक आणि आधारमधील नोंदणीकृत क्रमांक एकच असावा. कारण या प्रक्रियेदरम्यान एक OTP येतो, जो तुम्हाला सांगावा लागेल.

पोस्ट द्वारे

ग्राहक बँकेत जाण्‍याच्‍या स्थितीत नसल्‍यास, तो आपली कागदपत्रे आपल्या बँकेच्या होम ब्रँचमध्‍ये पोस्टाने पाठवून केवायसी पूर्ण करू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT