Latest

IND vs AFG T20 : अफगाणिस्तानला धक्का! राशिद खान टी-20 मालिकेतून बाहेर

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AFG T20 : भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी अफगाणिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या संघाचा अष्टपैलू खेळाडू राशिद खान संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. कर्णधार इब्राहिम झद्रानने याबाबत माहिती दिली आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका 11 जानेवारीपासून सुरू होत आहे. पहिला टी-20 सामना पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी राशिद खानचा अफगाणिस्तान संघात समावेश करण्यात आला होता. पण मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी तो या खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे. 25 वर्षीय राशिदच्या पाठीवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे. (IND vs AFG T20)

अफगाण कर्णधार इब्राहिम झद्रानने याबाबत खुलासा केला आहे. तो म्हणाला की, राशीदला प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडीसाठी उपलब्ध होण्यासाठी थोडा वेळ लागेल. सध्या तो अफगाणिस्तान संघासोबत चंदीगडला पोहोचला आहे. त्याने सराव सत्रातही भाग घेतला. पण पूर्णपणे तंदुरुस्त नाही. मला आशा आहे की तो शक्य तितक्या लवकर पूर्णपणे फिट होईल. डॉक्टरांच्या सल्ल्याने राशिदही आपल्या फिटनेसवर काम करत आहे.'

झद्रान पुढे म्हणाला की, 'मालिकेदरम्यान राशिद खानची आम्हाला उणीव नक्कीच भासेल. पण तुम्हाला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्याची गरज असते. त्यामुळे राशिद संघात नसला तरी अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत, जे त्याची पोकळी भरून काढतील. मी एवढेच म्हणेन की ते चांगले क्रिकेट खेळतील.' (IND vs AFG T20)

IND vs AFG T20 टी-20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला टी-20 सामना : 11 जानेवारी, मोहाली, संध्याकाळी 7 वाजता
दुसरा टी-20 सामना : 14 जानेवारी, इंदूर, संध्याकाळी 7 वाजता
तिसरा टी-20 सामना : 17 जानेवारी, बगळूर, संध्याकाळी 7 वाजता

मालिकेसाठी भारत आणि अफगाणिस्तानचे संघ :

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार.

अफगाणिस्तान संघ : इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), हजरतुल्ला झझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमतुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब-उर-रहमान, फजलहक फारुकी, फरीद अहमद, नवीन-उल-हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद आणि गुलबदीन नायब.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT