Latest

Cirkus : रणवीर बनला ‘इलेक्ट्रिक मॅन’; ‘सर्कस’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आगामी 'सर्कस' (Cirkus) हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटात रणवीरची मुख्य भूमिका असून रोहित शेट्टी यांनी दिग्दर्शन केले आहे. सध्या या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहून चित्रपटासाठी चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

रणवीर सिंह (Ranveer Singh) याने त्याच्या इंन्स्टाग्रामवर आगामी 'सर्कस' (Cirkus) चित्रपटातील धमाकेदार ट्रेलर रिलीज केला आहे. या ट्रेलरमध्ये पहिल्यांदा रणवीर सिंह 'इलेक्ट्रिक मॅन' म्हणून सर्कसमध्ये प्रवेश करतो. यानंतर तो सर्वांना इलेक्ट्रिकचा करंट दिल्यासारखे वागत असतो. यामुळे रणवीरला नेमके काय झाले आहे? हे वरुण शर्माला समजत नाही. यामुळे वरूण 'निसर्गाचा करिष्मा याला दुसरं काय म्हणावं?' असे म्हणतो. परंतु, काही ठिकाणी रणवीर आणि पूजा हेगडेची केमिस्ट्री दाखविली आहे.

तर काही ठिकाणी दोघांच्यात वाद होताना दिसतोय. दुसरीकडे रणवीरचा हमशक्कल कोणी असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, तो समोर आलेला नाही. या सगळ्यावरून हा चित्रपट रोमान्ससोबत भरपूर अॅक्शन सीनने भरलेला आहे. यामुळे चित्रपटासाठी चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

ट्रेलर रिलीजच्या आधी 'सर्कस'मधील कलाकारांनी लाल रंगाच्या पोशाखात 'ईना मीना डीका' या गाण्यावर परफॉर्म केला होता. रणवीर सिंह, पूजा हेगडेसोबत या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस, सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, व्रजेश हिरजी, विजय पाटकर, सुलभा आर्य, मुकेश तिवारी, अनिल चरणजीत, अश्विनी कळसेकर यांनीही भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात रणवीर सिंहची दुहेरी भूमिका आहे. नाताळच्या मुहूर्तावर म्हणजेच, २३ डिसेंबर २०२२ रोजी चित्रपट रिलीज होणार आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT