नवी दिल्ली : अवघ्या देशभराला आता अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापनेचे वेध लागले आहेत. अयोध्येत याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचत असताना सर्वांची उत्सुकता शिगेस पोहोचणे साहजिकच आहे. या पार्श्वभूमीवर, मातृत्वाची प्रतीक्षा असलेल्या अनेक गर्भवती महिलांनी आमची प्रसूती २२ जानेवारीलाच करा, अशी मागणी करत विविध इस्पितळ प्रशासनांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. २२ जानेवारीलाच प्रसूती झाल्यास आमच्या घरी राम येईल, अशी या महिलांची भावना आहे. (Ram Mandir Inauguration)