पुढारी ऑनलाईन डेस्क : आज आयपीएल २०२३ च्या हंगामातील ४८ सामना खेळवला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉय़ल्स आणि गुजरात टायटन्समध्ये रंगणार आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियवर खेळवला जाईल. दरम्यान, राजस्थानने टॉस जिंकला असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थानने ११८ धावा केल्या असून गुजरातसमोर ११९ धावांचे आव्हान ठेवले आहे.
राजस्थानकडून संजू सॅमसनने ३० धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला १५ धावांपेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. गुजरातच्या गोलंदाजीसमोर राजस्थानने अक्षरश: नांगी टाकली. गुजरातकडून राजस्थानने ४ षटकांमध्ये केवळ १४ धावा देत ३ विकेट्स पटकावल्या. नूर अहमदने २ तर मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, जोशुआ लिटलने प्रत्येकी १ विकेट पटकावली.