पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर दोन अज्ञात व्यक्तींनी रविवारी सकाळी गोळीबार केला. गॅलेक्सी बंगल्याबाहेर झालेल्या हल्ल्यानंतर मोठी खळबळ उडाली. आज सायंकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे हे गोळीबार प्रकरणानंतर सलमान खानच्या भेटीला गेले आहेत.
वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर आज पहाटे ५ वाजता मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी ५ वेळा फायरिंग करून पळ काढला. या घटनेनंतर बॉलिवूडसह संपूर्ण देशरात सुरक्षाव्यवस्थेबाबत विषय चर्चेत आला. आज सायंकाळी राज ठाकरेंनी सलमान खानला भेट देऊन या परिस्थितीचा आढावा घेतला.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात असला तरी त्याची टोळी बाहेर असून गोल्डी ब्रारही बाहेर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत याच टोळीने अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या घटनेनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा