raj kundra-urfi javed 
Latest

Raj Kundra-Urfi Javed : ‘उर्फी राज’ वादादरम्यान एकत्र, मास्क मॅन बनून…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने काही दिवसांपूर्वी मॉडेल, फॅशनिस्टा उर्फी जावेदवर टीका केली होती. त्यामुळे सोशल मीडियावरही त्यांची चर्चा झाली. यावर, उर्फीनेही सडेतोड उत्तर दिले. गप्प बसेल ती उर्फी कसली? (Raj Kundra-Urfi Javed) या वाद दरम्यान दोघांमधील संबंध आता ठिका होताना दिसताहेत. राज कुंद्रा आणि उर्फी जावेद यांचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. (Raj Kundra-Urfi Javed)

एका अनोख्या व्हिडिओसाठी राज कुंद्राने उर्फीला सहकार्य केलं आहे. उर्फी जावेद आणि राज कुंद्राचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये राज बऱ्याच काळानंतर चेहरा मास्क काढताना दिसत आहे.

राजने उर्फीसमोर चेहऱ्याचा मास्क काढला

राज कुंद्रा अॅडल्ट चित्रपटाच्या वादामुळे बरेच वादात राहिला होता. या प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या पतीला तुरुंगातदेखील जावे लागले होते. तुरुंगातून सुटल्यानंतर राज कुंद्राने आपला चेहरा सर्वांपासून लपवून ठेवला, त्यासाठी राजने फेस मास्कची मदत घेतली होती.

राज कुंद्रा जिथे जिथे दिसला तिथे तो मास्कमध्ये दिसला आणि त्यामुळे तो मास्क मॅन बनला होता. आता राजने मास्क उतरवला आहे. उर्फी जावेदने इन्स्टाग्राम हँडलवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये उर्फी जावेदने लिहिलं आहे-"हे तर केवळ ट्रेलर आहे." व्हिडिओमध्ये राज कुंद्रा मास्क उतरवताना दिसत आहे.

यानंतर फॅन्स अंदाज लावत आहेत की, राज कुंद्रा – उर्फी जावेद आगामी प्रोजेक्ट एकत्र दिसतील. राज कुंद्रा – उर्फी जावेद यांचा मास्क अंदाजात नेटकऱ्यांनी विनोदी अंदाजात घेतला. काही दिवसांपूर्वा उर्फीने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून राजला खरं-खोटं ऐकवलं होतं. कारण राजने उर्फीच्या ड्रेसिंग सेंसवर कॉमेंट केलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT