नवी दिल्ली, ११ एप्रिल, पुढारी वृत्तसेवा, उन्हाळाच्या हंगामात रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने यावर्षी २१७ विशेष गाड्यांच्या ४ हजार १० फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील प्रमुख स्थळांना रेल्वे मार्गांनी जोडण्यासाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मंगळवारी रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली.
उन्हाळी हंगाम विशेष गाड्या १० एप्रिल २०२३ पासून धावत आहेत. रेल्वेच्या निर्णयानूसार मध्य रेल्वेच्या १० विशेष गाड्या १०० फेऱ्या करतील.तर दक्षिण-मध्य रेल्वेच्या ४८ विशेष गाड्या सोडवण्यात येतील. या गाड्या ५२८ फेऱ्या करतील, अशी माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे.
हे ही वाचा :