नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अदानी मुद्दयावर केंद्र सरकारला लक्ष करतांना राहुल गांधी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नेत्यांवरही निशाणा साधला आहे. शनिवारी ट्विटरवरून राहुल यांनी अडानी यांच्यासह काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या नावाचा उल्लेख करीत अप्रत्यक्षरित्या त्यांना देशाचे लक्ष भरकटवण्यासाठी भाजपकडून वापरण्यात येणारे टूलकिट म्हणून संबोधित केले. ट्विट करीत त्यांनी अदानी समुहातील २० हजार कोटींच्या बेनामी पैशांचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला.
"सत्य लपवतात म्हणून दररोज भटकवतात. प्रश्न तोच आहे, अदानी कंपनीत २० हजार कोटींचा बेनामी पैसा कुणाचा आहे? अशा आशयासह राहुल यांनी एक ग्राफिक्स ट्विट केले आहे. या ग्राफिक्समध्ये अदानी यांच्या नावासोबत सहा नेत्यांचे नावांचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे, किरण कुमार रेड्डी, हिमंता बिस्वा सरमा आणि अनिल एंटनी यांच्या नावाचा त्यात उल्लेख आहे.
मुख्य मुद्दावरून लक्ष भटकवण्यासाठी वापरण्यात आलेले टूल म्हणून या नावाचा राहुल यांनी उल्लेख केला आहे.
अदाणीच्या मुद्यावर राहुल यांनी सरकारला धारेवर धरले आहे. सातत्याने ते प्रश्न उपस्थित करीत आहे.मंगळवारी देखील राहुल यांनी अडाणीच्या कंपनीमधील आर्थिक देवाणघेवाणीवर प्रश्न उपस्थित केला होता.