pyar ke do naam 
Latest

‘प्यार के दो नाम’ या चित्रपटाचा टीझर रिलीज, ‘मॉडर्न डेज लव्ह स्टोरी‘ही लवकरचं

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या नवनवीन कथांद्वारे प्रेमाची व्याख्या करण्यात येते. रिलायन्स एंटरटेनमेंट द्वारा प्रस्तुत आणि दानिश जावेदद्वारा दिग्दर्शित, 'प्यार के दो नाम' देखील आधुनिक काळातील प्रेमकथा आहे जी आजच्या नवीन पिढीसाठी प्रेमाची नवी व्याख्या करेल. या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये चित्रित झालेला पहिला चित्रपट आहे.

हा चित्रपट 'एक दुजे के लिए' किंवा 'एकमेकांसोबत' या टॅगलाईनवर आधारित आहे. इश्क सुभानल्लाह सुफियाना, प्यार मेरा आणि सन्यासी मेरा नाम यांसारख्या रोमँटिक मालिका आणि चित्रपटांचे लेखक दानिश जावेद दिग्दर्शित "प्यार के दो नाम" ही एक आधुनिक प्रेमकथा आहे.

चित्रपटाच्या टीझरची सुरुवात अलीगढ मुस्लिम विद्यापीठात आयोजित शांतता चर्चासत्राने होते, ज्यामध्ये आर्यन खन्ना (भव्या सचदेवा) नेल्सन मंडेला आणि कायरा सिंग (अंकिता साहू) महात्मा गांधींवरील त्यांचे संशोधन सादर करतात. आर्यन खन्ना म्हणतो की, जे सौंदर्य डोळ्यांना आकर्षित करत नाही त्या सौंदर्याला मी सौंदर्य मानत नाही. टीझरच्या दुसऱ्या डायलॉगमध्ये आर्यन खन्ना रोमँटिक डायलॉगमध्ये म्हणतो, 'मंडेला जी ही ट्रॉफी जिंकेल, आणि मी ह्या मुलीचे हृदय. यावर कायरा सिंगने अतिशय सरळ शब्दात सांगितले की, मी अनोळखी व्यक्तींशी बोलत नाही. दोन प्रमुख कलाकारांच्या गदारोळात, चित्रपटाचे शीर्षक गीत पार्श्वभूमीत ऐकू येते. शीर्षक गीतासह हा १ मिनिट १० सेकंदाचा टीझर एका ताज्या प्रेमकथेची अनुभूती देतो.

"प्यार के दो नाम" मध्ये भव्या सचदेवा, अंकिता साहू यांच्यासह कनिका गौतम, अचल टंकवाल, दीप्ती मिश्रा, नमिता लाल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती विजय गोयल आणि दानिश जावेद यांनी केली असून सहनिर्माते शहाब अलाहाबादी आहेत. चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक दानिश जावेद आहेत. ह्या चित्रपटाची गाणी जावेद अली, रितू पाठक, राजा हसन आणि स्वाती शर्मा यांनी गायली आहेत.

चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक दानिश जावेद म्हणाले की, हा चित्रपट जगातील दोन महान नेत्यांच्या तत्त्वांवर आधारित आजची प्रेमकथा आहे. आर्यन खन्ना आणि कैरा सिंग यांच्या या प्रेमकथेतून प्रेक्षकांना "एकमेकांसाठी" की "एकमेकांसोबत " या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.
या चित्रपटाचे निर्माते विजय गोयल म्हणाले, "हा चित्रपट, प्यार के दो नाम, महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांच्या प्रेम तत्वज्ञानाच्या दरम्यान अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सेट केलेली एक अनोखी प्रेमकथा आहे.

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांच्या सन्मानार्थ "जागतिक शांतता नेता" निवडण्यासाठी चर्चासत्राच्या घोषणेने चित्रपटाची सुरुवात होते. सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी कायरा सिंग आणि आर्यन खन्नाही आले आहेत. पहिल्या भेटीतच दोघांमध्ये कडवी झुंज सुरू होते, इथूनच दोन विचारसरणीचा संघर्ष सुरू होतो. प्रेम असेल तर आयुष्यभर एकत्र राहावं लागेल यावर कायरा ठाम आहे, तर आर्यनचा असा विश्वास आहे की जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत आपण एकत्र राहू, एकदा प्रेम संपलं की दूर. आता "प्यार के दो नाम" पैकी कोण जिंकतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल, "प्यार के दो नाम" रिलायन्स एंटरटेनमेंट तर्फे ३ मे रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT