Latest

कंपनीच्या आर्थिक संकटातही विजय मल्ल्याकडून स्थावर मालमत्तेची खरेदी

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : बँकेचा पैसा बुडवून फरार झालेला व्यवसायिक विजय मल्ल्या याने किंगफिशर एअरलाईन्स आर्थिक संकट असताना २०१५-१६ दरम्यान इंग्लड तसेच फ्रान्समध्ये ३३० कोटींची संपत्ती खरेदी केली होती. सीबीआयाने त्यांच्या आरोपपत्रातून हा दावा केला आहे. बॅंकांनी मद्य व्यवसायिकांकडून कर्जाची वसूली केली नव्हती. तेव्हा त्याने ही संपत्ती खरेदी केल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

विजय मल्ल्या याच्यावर देशातील बॅंकांची ९०० कोटींहून अधिकची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मल्ल्या याच्याजवळ २००८ तसेच २०१७ दरम्यान बॅकांच्या कर्जांची परतफेड करण्यासाठी मुबलक पैसा होता, असे सीबीआयने आरोपपत्रातून सांगितले होते. मल्ल्याने तेव्हा संपूर्ण यूरोपमध्ये 'वैयक्तिक मालमत्ता' खरेदी केली. तसेच स्विझर्लंडमध्ये आपल्या मुलांच्या ट्रस्टला पैसे हस्तांतरित केले होते. सीबीआयाने न्यायालयाची परवानगी घेतल्यानंतर मल्ल्याच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या विवरणसाठी विविध देशांना एक पत्र पाठवले होते. एजेन्सीला मिळालेल्या माहितीनूसार मल्ल्याने फ्रान्समध्ये ३५ मिलियन यूरो मध्ये स्थावर मालमत्ता खरेदी केली होती. मल्ल्याने त्यांची एक कंपनी गिझ्मो होल्डिंगच्या खात्यातून ८ मिलियन यूरो देण्याची मागणी केली होती.

मल्याने २०१६ मध्ये भारत सोडताना तो ब्रिटेनमध्ये राहत असल्याचे सांगितले होते. खटल्यासाठी त्याला परत आणण्याची प्रकिया सुरू आहे. मल्या याच्यावर कथितरित्या ९०० कोटी रूपयांहून अधिक आयडीबीआय बॅंक किंगफिशर एअरलाईन्स कर्ज घोटाळ्याचा आरोप आहे. सीबीआय याचा तपास करीत आहे. तपास यंत्रणांनी अगोदर दाखल केलेल्या आरोपपत्रात ११ जणांचे नाव आहे. आता पुरक आरोपपत्र सादर केले असून त्यात आयडीबीआयचे माजी महाव्यवस्थापक बुद्धदेव दासगुप्ता यांचे नाव जोडण्यात आले आहे. सीबीआयनुसार दासगुप्ता यांनी ऑक्टोबर २००९ मध्ये १५० कोटी रुपयांचे अल्पमुदतीचे कर्जाला मंजूरी तसेच वितरणात कथितरित्या आपल्या अधिकारांचा दुरूपयोग केला. तसेच आयडीबीआय बॅंक आणि विजय मल्ल्याच्या अधिकाऱ्यांसोबत षडयंत्र रचण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

                           हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT