पुणे पोलिस आयुक्तालयातील रिक्त पदासाठी 2019 ची पोलिस शिपाई पदासाठीची लेखी परीक्षा 5 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. उमेदवारांना 22 सप्टेंबरपासून हॉल तिकीट दिले जाणार आहेत. पहिल्यांदाच पोलिस भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा अगोदर होत असून त्यामध्येही लेखी परीक्षा खासगी यंत्रणेच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पोलिस भरतीमध्ये पहिल्यांदा लेखी व नंतर मैदानी परीक्षा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पहिल्यांदाच प्रत्येक घटकाला खासगी यंत्रणेमार्फत लेखी परीक्षा घेण्यास सूचविले. त्यानुसार पुणे पोलिस आयुक्तालयाची लेखी परीक्षा जी. एस. सॉफ्टवेअर कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे.
पोलिस पदासाठी लेखी परीक्षा 5 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 ते 12.30 दरम्यान होणार आहे. त्यासाठी 22 सप्टेंबरपासून हॉलतिकीट इमेलवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. परिक्षेत गैरप्रकार घडू नये म्हणून सीसीटीव्ही, बायोमेट्रीक सुविधा, व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे.
शहरात 143 केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. करोनाच्या बाबातीत सर्व नियम पाळले जाणार आहेत. त्यासाठी कंपनीकडून नियोजन करण्यात आले आहे. या परीक्षाकेंद्रावर 2198 ब्लॉक तयार केले असून प्रत्येक ब्लॉकमध्ये 24 विद्यार्थ्यांची क्षमता राहणार आहे.
पुणे पोलिस आयुक्तालयातील रिक्त झालेल्या 214 पोलिस शिपाई पदासाठी सन 2019 मध्ये जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीनुसार 39 हजार 323 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पण, करोनामुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. आता करोना कमी झाल्यानंतर या भरती प्रक्रियेला सुरवात करण्यात आली आहे.
उमेदवरांना त्यांच्या रजिस्टर इमेलवर हॉल तिकीटची लिंक पाठवली जाईल.
तसेच, https#:// mahapolicerc.mahaitexam.in/Phaseone या लिंकवर युझरनेम आणि पासवर्ड वापरून लॉगिन करून हॉल तिकीट डाऊनलोड करा.
त्याबरोबरच https#:// mahapclicerc.mahaitexam.in/Phaseone याच लिंकवर डाउनलोड हॉल तिकीट या बटनावर क्लिक करून हॉलतिकीट डाउनलोड करा.
याचबरोबर ऍपलिकेशन आयडी, आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख अर्जात भरल्याप्रमाणे टाकून हॉल तिकीट मिळवता येईल. अडचण आल्यास ९६९९७९२२३०, ८९९९७८३७२८, ०२०-२६१२२८८० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.