पुणे, पुढारी वृत्तसेवा: न्यायालयात महिला वकिलांकडून वारंवार करण्यात येणार्या केशांच्या रचनेत बदल करण्याच्या पध्दतीमुळे न्यायालयात कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे महिला वकिलांनी केस मोकळे सोडू नये. तसेच वारंवार केस ठिक करण्याची कृती करू नये, अशी सूचना देणारी नोटीस शनिवारी समाजमाध्यमांवर झळकली. त्यावर टिका झाल्यानंतर प्रशासनाने हा निर्णयच मागे घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
न्यायालय प्रशासनाने 20 ऑक्टोंबर रोजी नोटीस काढत ती प्रसिध्द केली होती. त्यावर वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी व्वा, आत्ता बघा महिला वकिलांकडून कोण का विचलित होत आहे, अशा आशयाचे ट्विट प्रशानाने काढलेल्या नोटीशीसह प्रसिध्द केले होते. मात्र, त्याचा चुकीचा अर्थ लागत असल्याचे लक्षात आल्यानंतर वाद होऊ नये म्हणून नोटीस मागे घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.