नवी दिल्ली : भोपळ्याच्या बिया (Pumpkin seeds) आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहेत, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. या बियांमध्ये फॅटी अॅसिडस्, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, अत्यावश्यक अमिनो अॅसिड आणि फिनोलिक संयुगे असतात. या बियांचे सेवन केल्याने मधुमेह, हृदयरोग, स्नायू किंवा हाडे दुखणे, केस गळणे आणि मुरुमांवर नियंत्रण मिळवता येते.
भोपळ्याच्या बियांमध्ये (Pumpkin seeds) अँटीऑक्सिडेंट, दाहक-विरोधी, अँटीमाइक्रोबायल, संधिवात-विरोधी आणि मधुमेह-विरोधी गुणधर्म असतात. यामुळे कर्करोग आणि यूटीआयचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. भोपळ्याच्या बिया आणि त्यांचे तेल त्वचेसाठी फायदेशीर आहे. बियांमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि सी कोलेजनचे उत्पादन वाढवतात. कोलेजन जखम भरण्यास मदत करते. हे त्वचा तरुण आणि सुरकुत्यापासून मुक्त ठेवते. तेलात ओमेगा -3 फॅटी अॅसिड आणि कॅरोटीन असते. हे पुरळ, फोड आणि त्वचेच्या तीव्र दाहांवर उपचार करू शकतात.
हे स्क्रब, लोशन किंवा मालिश करताना बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्गापासून देखील संरक्षण करते.भोपळ्याच्या बियांचा (Pumpkin seeds) आहारात समावेश केल्यास कोलेस्टेरॉल जमा होणे आणि रक्तवाहिन्या कडक होणे टाळता येते. हे हृदयाच्या विविध समस्या जसे कोरोनरी धमनी रोग, स्ट्रोक इत्यादींना प्रतिबंध करते. या बियांमध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड चांगल्या प्रमाणात असतात. तसेच जस्तही भरपूर असते. हे टक्कल पडण्याची समस्या दूर करण्यास मदत करते. हे केस गळण्याच्या समस्येवर मात करण्यास मदत करते. भोपळ्याच्या बियांमध्ये मधुमेह विरोधीही गुणधर्म असतात.
हेही वाचा :