Pulkit Samrat-Kriti Kharbanda 
Latest

Pulkit Samrat Kriti Kharbanda Wedding : पुलकित सम्राट-कृति खरबंदाचे आज लग्न; मेन्यूमध्ये दिल्‍ली-६ चाट अन्‌ बरचं काही..

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुलकित सम्राट-कृति खरबंदा यांनी लग्नासाठी दिल्ली-एनसीआर निवडले आहे. पुलकित सम्राट दिल्लीचे राहणारे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पुलकित या लग्नासाठी दिल्लीच्या जवळपासचे ठिकाण हवे होते. त्यामुळेच त्याने एनसीआर येथील मानेसरच्या आयटीसी ग्रँड भारत लग्नासाठी निवडले. (Pulkit Samrat Kriti Kharbanda Wedding) सूत्रांच्या माहितीनुसार, १४ मार्च आणि १५ मार्च दोन दिवस लग्नाचे कार्यक्रम आहेत. पुलकित – कृति टिपिकल इंडियन लग्न करायचे आहे, त्याप्रमाणे तयारी करण्यात आली आहे. आज या लव्हबर्डचे लग्न आहे. (Pulkit Samrat Kriti Kharbanda Wedding)

लग्नात होतील २०० पाहुणे सहभागी

पुलकित आणि कृति खरबंदाच्या या ग्रँड वेडिंगमध्ये दोन्ही कपलकडून जवळपास २०० पाहुणे सहभागी होतील. सूत्रांच्या माहितीनुसार, काही पाहुणे १३ मार्च रोजी लग्नस्थळी पोहोचतील. अन्य पाहुणे १५ मार्चपर्यंत लग्नाच्या ठिकाणी पोहोचतील. या लग्नात काही जवळचे पाहुणे आणि चित्रपट इंडस्ट्रीशी संबंधित लोक सहभागी होणार आहेत. १५ मार्चला लंच टाईममध्ये हळद आणि सायंकाळी लग्नाचा सोहळा होईल.

राजस्थान आणि बॉलीवूड प्रेरित ड्रेसेज देखील लग्नाच्या कार्यक्रमात परिधान केले जाईल. लग्न शाही होण्यासाठी ड्रेसेजदेखील खास लक्ष देण्यात आले आहे.

राजस्थान आणि बॉलीवूड प्रेरित ड्रेसेज देखील लग्नाच्या कार्यक्रमात परिधान केले जाईल. लग्न शाही होण्यासाठी ड्रेसेजदेखील खास लक्ष देण्यात आले आहे. सूत्रांनुसार, कृति-पुलकितच्या लग्नात कोलकाता, बनारस, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्लीतील तमाम खास डिशेस असतील. दिल्ली 6 चाट देखील मेन्यूमध्ये असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT