Latest

‘पुढारी’ शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलची यशस्वी सांगता

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : फॅशनेबल कपडे, ज्वेलरी, गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅक्सेसरीजची रेलचेल यासोबत खाद्यपदार्थांवर ताव मारण्यासाठी कोल्हापूरकरांनी आयर्विन ख्रिश्चन मैदानावर गर्दी केली होती. कोल्हापूरकरांच्या अलोट गर्दीच्या साक्षीने फेस्टिव्हलची मंगळवारी (दि. 26) यशस्वी सांगता झाली. प्रदर्शनासाठी सहप्रयोजक रॉनिक स्मार्ट वॉटर हिटर व सोसायटी चहा हे होते, तर आईस्क्रीम पार्टनर क्रेझी आईस्क्रीम होते.

दै. 'पुढारी', टोमॅटो एफ. एम., कस्तुरी क्लबतर्फे पाच दिवसांपासून शॉपिंग फेस्टिव्हलचे आयोजन आयर्विन ख्रिश्चन ग्राऊंड येथे करण्यात आले होते. बचत गट, लघू उद्योजकांपासून विविध कंपन्यांची वाहने, वेगवेगळ्या ब्रँडस्च्या वस्तू फेस्टिव्हलमध्ये मांडण्यात आल्या होत्या. दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रिक वाहने, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅक्सेसरीज, नवनव्या ट्रेंडचे कपडे, ज्वेलरी, आयुर्वेद, फॅशनेबल चप्पल, शूज, पडदे, साड्या, फॅशन आणि लाईफ स्टाईल पाहण्यासाठी व खरेदीला झुंबड उडाली होती.

फूड फेस्टिव्हलमधील लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी कोल्हापूरकरांनी धाव घेतली होती. शाकाहारी-मांसाहारी मेजवाणीसोबतच मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांचा ग्राहकांनी मनमुराद आनंद लुटला. ख्रिसमस निमित्ताने केलेली आकर्षक सजावट, सांताक्लॉजच्या प्रतिकृती, तोल न जाता उंच काठीवर चालणारे स्टीकमॅन, जगलर आणि जोकर हे आबालवृद्धांच्या कुतूहलाचा विषय होते. अनेक जण सांताक्लॉज आणि स्टीकमॅनसोबत सेल्फी काढून घेत होते.

करा ओके ट्रॅकवरील गीतांचा कार्यक्रम, ख्रिसमस स्पेशल डी.जे. नाईट या बॉलीवूड आणि टॉलीवूड गीतांच्या कार्यक्रमांना ग्राहकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. मंगळवारी शेवटचा दिवस असल्याने ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर या प्रदर्शनाला भेट देऊन खाद्य मेजवानीसोबत मनसोक्त खरेदीचा आनंद घेतला. आता पुढील वर्षीच अशी संधी मिळणार असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत लोक प्रदर्शनाला भेट देत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT