गोमटेश स्कूलमध्ये IQ टेस्टचे आयोजन; दै. ‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशनचा उपक्रम  
Latest

गोमटेश स्कूलमध्ये IQ टेस्टचे आयोजन; दै. ‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशनचा उपक्रम

रणजित गायकवाड

निपाणी : पुढारी वृत्तसेवा

तीन ते बारा वर्षांतील मुलांच्या बौद्धिक क्षमता (IQ) वाढीबरोबरच व्यक्‍तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी दै. 'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशन (prayog social foundation) व गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल निपाणीच्या (gomtesh english medium school nipani) वतीने जिल्हास्तरीय आयक्यू टेस्टचे (IQ) आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. 27) गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल, सद‍्गुरू हॉस्पीटलजवळ गोमटेशनगर, मुरगूड रोड, निपाणी येथे सकाळी 11 वाजता ही टेस्ट होणार आहे.

यावेळी पालकांसाठी 'पाल्यसंगोपन व संस्कार' यावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. गोमटेश विद्यापीठाच्या संचालिका उषा संजय पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमामध्ये सहभागी सर्व मुलांना प्रशस्तिपत्र व वयोगटानुसार प्रथम क्रमांकाने गौरवण्यात येणार आहे.

हा उपक्रम विनाशुल्क असून 96110985308618365500 या क्रमांकावर नोंदणी करण्यासाठी इच्छुक पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी www.gemsnipani.com या वेबसाईटला भेट द्‍या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT