आजचे राशिभविष्य  
Latest

आजच आपलं राशीभविष्य (दि. ६ एप्रिल २०२३)

Shambhuraj Pachindre
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : ठराविक काळाने येणारा मानसिक आणि शारीरिक थकवा काही प्रश्न निर्माण करेल. शरीराची प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी विश्रांतीची गरज.[/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : तुमच्या नोकरीला चिकटून राहा आणि तुम्हाला आज कुणी मदत करील, अशी अपेक्षा बाळगू नका. विनाकारण तणावात राहू नका.[/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन: आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने चिंतीत राहू शकतात. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता.[/box]

कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. संकटावर मात करायची इच्छाशक्ती जबर आहे, तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही.[/box]

सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे, म्हणून मिळणार्‍या सर्व संधींचे सोने करा. तुमचा रिकामा वेळ वापरा.[/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही जोडीदाराशी कदाचित वाद घालाल. जोडीदाराशी प्रेमाने वागा.

तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तुळ : तुम्ही बराच काळ विचार करण्यात घालवू शकतात. तुमचे तुमच्या जोडीदाराशी भांडण होईल. एकमेकांना समजावून घ्या.[/box]

वृश्‍चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे दिवसभराचा आनंद मावळेल. यावर मात करा; अन्यथा समस्या अधिक गंभीर बनेल.[/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील, तर आजचा दिवस मात्र चांगला आहे. मन उत्साही राहील.[/box]

मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : इतरांबद्दल वाईट इच्छा बाळगण्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल. अशा प्रकारचे विचार टाळणे गरजेचे आहे.[/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : मुले तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत, त्यामुळे तुम्ही उद्विग्न व्हाल. तुमचा अनियंत्रित राग सर्वांना त्रासदायक ठरू शकतो.[/box]

मीन

[box type="shadow" align="" class="" width=""]मीन : सहलीच्या ठिकाणी जाऊन प्रेमी जीवनात आनंद आणाल. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल.[/box]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT