पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून ( दि. १७ ) प्रारंभ होत आहे. यापूर्वी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या आमदारांनी विधानसभेच्या पायर्यावर तीव्र निदर्शने करत राज्य सरकारचा निषेध केला.
घटनाबाह्य, कलंकित सरकारचा धिक्कार असो, असा फलक हाती घेवून विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारचा निषेध केला. यावेळी घटनाबाह्य सरकारचा धिक्कार असाे, अशी जाेरदार घाेषणाबाजी करण्यात आली. यावेळी शरद पवार गटाचे आमदार उपस्थित नव्हते. त्यामुळे हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.