lightning 
Latest

Protect from lightning : पावसाच्या दिवसात कोसळणाऱ्या विजेपासून असा करा बचाव

मोनिका क्षीरसागर

सातारा; पुढारी वृत्तसेवा: गेल्या काही दिवसांपासून वळीव पावसाचे तांडवनृत्य सुरू असून, कुठे ना कुठे अघटित घडू लागले आहे. वादळी वारे, विजेचा थरथराट कापरं भरवत आहे. नारळाची झाडे, उंच इमारती यावरच बहुतांश वेळा वीज कोसळली आहे. यामागच्या शास्त्रीय कारणांबाबत नागरिकांत प्रचंड उत्सुकता आहे. या विजेचे आकर्षण हे प्रामुख्याने उंच वृक्ष, पाणी याकडे असल्यामुळे झाडांवर, उंच इमारतीवर वीज कोसळण्याचे प्रकार अधिक घडत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळे विजा चमकत असताना झाडाखाली उभे राहणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे पावसाच्या दिवसात कोसळणाऱ्या विजेपासून (Protect from lightning) असा करा बचाव..

Protect from lightning: हेही लक्षात घ्या

काळे ढग दाटीवाटीने आकाशात जमा झाले की वीज कडाडणार, पाऊस पडणार हे निश्चित असते. विजांच्या कडकडाटासह अचानक पाऊस सुरू झाल्यास स्वतःला सुरक्षित करण्यासाठी घरात किंवा एखाद्या इमारतीत आसरा घ्यावा. गुरांचा उघडा गोठा किंवा एखादे शेड तुमचा विजेपासून बचाव (Protect from lightning) करू शकणार नाही.

वीज बनतेय यमदूत

पावसात लखलखाट करणारी वीज यमदूत बनत असून, अलीकडे तर वीज पडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. तज्ज्ञांच्या मते वीज केव्हाही, कोठेही पडू शकते. विजेचे आकर्षण हे प्रामुख्याने उंच वृक्ष, पाणी याकडे असल्यामुळे झाडांवर, उंच इमारतीवर वीज कोसळण्याचे (Protect from lightning) प्रकार अधिक घडत असतात.

रानात असाल तर मोकळ्या मैदानात उभे राहा

घरात कुठलेही इलेक्ट्रिकचे उपकरण हाताळताना काळजी घ्या. दारे व खिडक्यांपासून दूर राहा. विजेपासून वाहणारा प्रवाह तारा, केबल, पाईपमधून वाहून तुमच्या शरीराला इजा पोहोचवू शकतो. पाऊस व वीज चमकत असताना तुम्ही शेतात असाल अन् त्यावेळी एखादी इमारत जवळ नसेल, तर मोकळ्या मैदानात झाडापासून दूर उभे राहा.

अंगणात दूरवर लोखंडी पहार का टाकली जायची?

लोखंड किंवा तांबे या धातूकडे वीज लगेच आकृष्ट होते. त्यामुळे लोखंड किंवा तांब्याची वस्तू जवळ असेल तर, ती दूर ठेवा. जुन्याकाळी विजा होत असताना लोक लोखंडाची पहार किंवा मोठी लोखंडी वस्तू अंगणात दूरवर फेकून देत. त्यामुळे पडणारी वीज घरावर न येता पहारीकडेच आकर्षित व्हावी, हा त्यामागील उद्देश होता.

कोसळणाऱ्या विजेपासून असा करा बचाव….

• विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नका.

• पाण्यात असाल तर तत्काळ बाहेर पडा.

• पावसातून प्रवास करत असाल तर मोबाईल बंद ठेवा.

• नळ, फ्रीज, टेलिफोन, विद्युत उपकरणांपासून सावध राहा.

• धातूपासून बनवलेल्या वस्तू व विजेच्या खांबापासून दूर राहा.

• पावसात थांबण्याशिवाय पर्याय नसेल तर खोलगट ठिकाणी थांबा.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT